न्यू मेक्सिको मधे व्हिक्टोरिया पीक खजिना
१९३७ मधील एका सकाळी डॉक नोस न्यू मेक्सिकोच्या हम्ब्रिल्लो बेसिन जवळ काही ताजे पाणी शोधण्यासाठी गेला. तिथे त्याला एक भूयारासारखी गोष्ट दिसली ज्यामधून खाली एक जिना जात होता. खाली गेल्यावर त्याला जवळ जवळ २०० सोन्याच्या राशी दिसल्या. लालसेपोटी त्याने खजिन्याचे तोंड आणखी रुंद करण्यासाठी प्रयत्न केला परंतु स्फोटामुळे तो रस्ताच बंद झाला आणि खजिन्यापर्यंत पोचणे अशक्य बनले. अनेक लोकांनी हा खजिना काढण्याचे प्रयत्न केले परंतु सर्व अयशस्वी झाले.