Android app on Google Play

 

द लॉस्ट डचमेन माइन

 

एक सोन्याची खाण अमेरिकेच्या साउथ वेस्टर्न भागात आहे. मानले जाते की ती सुपरस्टीशन माउंटन मध्ये कुठेतरी आहे. हा भाग एरिझोना मध्ये ईस्ट फोनिक्स जवळ अपाचे जंक्शनच्या जवळ आहे. येथील अपाचे जातीच्या लोकांच्यात अशी मान्यता आहे की त्यांच्या देवता कोणालाही या खजिन्याच्या जवळ देखील फिरकू देत नाहीत. स्पेनच्या फ्रांसिस्को वास्क डी कोरोनाडोने जेव्हा ही खाण शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या माणसांचे मृत्यू होऊ लागले आणि आणि त्यांच्या प्रेतांचे खच पडले. १८४५ मध्ये इथे डॉन मिगुएल पेराल्टाला थोडे सोने मिळाले परंतु स्थानिक अपाचे लोकांनी त्याची हत्या केली आणि त्यांनी ते सोने सर्व प्रदेशात विखरून टाकले आणि खाणीचे प्रवेशद्वार नष्ट केले. या सोन्याच्या खाणीच्या शोधात तीन वर्षांपूर्वी डेनवर निवासी जेस केपेनने देखील अभियान छेडले होते, परंतु २०१२ मध्ये त्याचे फक्त प्रेत मिळाले.