Android app on Google Play

 

एल डोराडो चा खजिना

 

एल डोराडोच्या खजिन्याच्या शोधात आजपर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. म्हटले जाते की हा खजिना कोलंबिया च्या गुआटाविटा दरीत पुरलेला आहे. खरे म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी इथले चिब्बा आदिवासी सूर्याची आराधना करण्यासाठी खूप सारे सोने दरीत फेकत असत. अनेक वर्षे हा क्रम चालू राहिल्याने दरीच्या तळाशी मोठ्या प्रमाणावर सोने साठले होते. हा खजिना मिळवण्यासाठी स्पेनचा दरोडेखोर फ्रान्सिस्को पिजारो याने देखील खूप प्रयत्न केले होते, परंतु त्याला यश आले नाही. याव्यतिरिक्त पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान संपूर्ण कोलंबियाच या खजिन्याच्या शोधात राबले, परंतु आजपर्यंत हा खजिना कोणालाही मिळालेला नाही.