चंगेज खानचा खजिना
चांगेज खान हा मंगोल साम्राज्याचा सर्वांत प्रसिद्ध आणि महान योद्धा होता. त्याने त्या काळातील जवळ जवळ सर्व जगावर विजय मिळवला होता. जेव्हा १२२७ मध्ये त्याचा मृत्यु झाला, तेव्हा असे म्हणतात की त्याला एका अज्ञात मकबऱ्यात लपवण्यात आले आणि त्या काळच्या सर्वांत महान योद्ध्यासोबत त्याचा खजिना देखील ठेवण्यात आला. अर्थात, असे म्हणतात की या खजिन्याच्या शोधात आजपर्यंत जे कोणी गेले ते परतून आले नाहीत.