जयपुरचा मान सिंग १ चा खजिना
कथांच्या नुसार मानसिंग १ जो अकबराच्या सेनेचा प्रमुख होता, जेव्हा १५८० मध्ये अफगाण स्वारीवरून परत आला तेव्हा त्याने खजिना अकबराला दिला नाही. असे म्हटले जाते की खजिना किल्ल्यातच कुठेतरी पुरलेला आहे. आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधीनी खजिन्याच्या शोधाची आज्ञा दिली. अर्थात सरकारच्या सांगण्यानुसार या शोधातून काहीही मिळाले नाही, परंतु विरोधी पक्षाचा दावा होता की खजिना पंतप्रधानांच्या घरी पोचवण्यात आला होता. कारण तब्बल ६ महिने दिल्ली - जयपूर रस्ता जनतेसाठी बंद ठेवण्यात आला होता.