इंका संस्कृतीचा खजिना
असे म्हणतात कि, जितके सोने अमेरिकेतील बँकांकडे आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट सोने इंका लोकांकडे होते. हे सोने त्यांनी जवळ जवळ ४०० वर्षांपूर्वी स्पेनचा दरोडेखोर फ्रान्सिस पिजारो पासून वाचवण्यासाठी तिथल्याच एका ज्वालामुखीतळात टाकून दिले. या खजिन्याच्या शोधात आतापर्यंत कित्येक लोक आपला जीव गमावून बसले आहेत. परंतु आजपर्यंत खजिन्याचा पत्ता लागलेला नाही.