Get it on Google Play
Download on the App Store

काहुएंगा दर्राचा खजिना

या खजिन्याचा इतिहास अतिशय रोचक आहे. सन १८६४ मध्ये मेक्सिको चे राष्ट्रपती बेनिटोने आपल्या काही सैनिकांना खजिना घेऊन सन फ्रान्सिस्कोला पाठवले होते. परंतु मध्ये रस्त्यात काहीतरी गडबड झाली आणि एका सैनिकाचा मृत्यू झाला. बाकीच्या तीन सैनिकांनी खजिना रस्त्यातच जमिनीखाली पुरला. म्हटले जाते की असे करताना त्यांना एक व्यक्ती डिएगो मोरेना याने पाहिले. सैनिक निघून गेल्यावर त्याने तो खजिना बाहेर काढून जवळच्याच एका टेकडीच्या वर पुरला. परंतु त्याच रात्री डिएगोचा देखील मृत्यू झाला. आपल्या मृत्युच्या पूर्वी त्याने हे रहस्य आपल्या मित्राला सांगितले. पुढे १८८५ मध्ये बास्क शेफर्ड नावाच्या एका व्यक्तीला या खजिन्यातील थोडाफार हिस्सा मिळाला. तो या खजिन्याला स्पेनमध्ये घेऊन चालला होता, तेव्हाच समुद्रात खजिना बुडाला. आजपर्यंत हा खजिना कोणालाही मिळालेला नाही.