द अंबेर रूम
द अंबेर रूम सोन्यापासून बनलेली एक खोली होती जिची निर्मिती १७०७ मध्ये पर्शिया मध्ये झाली होती. द अंबेर रूमच्या आतील सर्व काम सोन्याचे होते. याला काही लोक विश्वातील आठवे आश्चर्य देखील म्हणतात. ही रुस आणि पर्शिया दरम्यान शांती - तहाच्या उत्सवादरम्यान पीटर द ग्रेट याला भेटीच्या स्वरुपात मिळाली होती. तेव्हापासून द अंबेर रूम रशियातच होती. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जर्मन लोकांनी तिच्यावर कब्जा केला आणि तिला सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या भागांत तिची विभागणी केली. या सर्व तुकड्यांना १९४३ मध्ये एका म्युझियम मध्ये प्रदर्शित करण्यात आले. जिथून ही सगळीच्या सगळी द अंबेर रूम अचानक गायब झाली. तेव्हापासून या खजिन्याचा आजपर्यंत शोध लागलेला नाही.