अभंग २८ - भक्तअमरस्वस्तिक्षेम ॥ चर...
भक्तअमरस्वस्तिक्षेम ॥ चरनरजेडौरलेव्योम ॥ मगकैलासीमंदाकिनिसोम ॥ नीलकंठेशिरीधरिली ॥१॥
धन्यविष्णुचरणीचीगंगा ॥ पतनहोतामहालिंगा ॥ भीमरथीमृत्युलोकीसवेगा ॥ इंद्रायणीसमरस ॥२॥
भोगावतीपाताळागेली ॥ मगविष्णुचरणीगुप्तठेली ॥ त्रिंबकेसीखरी ॥३॥
मगकितीकाळीभागीरथी ॥ सगरउद्धरिलेत्वरिती ॥ भागीरथीआणिलीसारथी ॥ विष्णूतीर्थेकरूनिया ॥४॥
ऐशातिहीत्रिभुवनीज्याचीथोरी ॥ तोमुकुटमणिश्रीहरी ॥ त्यातेसोडलियामुक्तीचारी ॥ कायआम्हातारिती ॥५॥
सर्वतीर्थेज्याचेरंक ॥ आम्हीतयाचेसेवक ॥ ज्याचेनिनामेहेत्रैलोक्य ॥ नामघेतातरती ॥६॥
तोपूर्णबीजमंत्रआम्हीजाणे ॥ विष्णुविणकाहीनेणे ॥ पूर्णब्रह्मकायम्हणे ॥ हामहिमातूजाणसी ॥७॥
ज्ञानदेवेनमस्कारिलेहरी ॥ निवृत्तिसोपानझडकरी ॥ मुक्ताबाईभेटलीलौकरी ॥ ज्ञानदेवाकरीधरियेले ॥८॥