अभंग ९ - देवम्हणेनामया ॥ ऐकयेथेउच...
देवम्हणेनामया ॥ ऐकयेथेउचितदया ॥ एकेक तीर्थसांगावया ॥ हेतोपुराणी ॥१॥
नकळेदेवाची थोरी ॥ कैसेपुढारलेमुरारी ॥ गौप्यगुजश्रीहरी ॥ सांगतसेनामया ॥२॥
पुराणम्हणसीकोणकथा ॥ तरीऐकेगातूसकळार्था ॥ शैवशास्त्रीहाग्रंथसर्वथा ॥ सिद्धमार्गअसे ॥३॥
जेजेजुनाटक्षेत्रतीर्थ ॥ जेजेब्रह्मनामेपरमार्थ ॥ तेतेसांगीतलेहित ॥ चतुरानने ॥४॥
ऐसेदेवमुखीचेवचन ॥ ऐकतासंतोषलेपूर्ण ॥ मगदेतातिआलिंगन ॥ एकमेकांसी ॥५॥
जेजैकाराचीध्वनी ॥ विठ्ठलनामेगर्जेवाणी ॥ प्रेम वोसंडितनयनी ॥ स्फुंदनरोमांचित ॥६॥
स्फुंदननामाचेगाये ॥ परसाम्हणेवोळलीमाये ॥ तोज्ञानासीपान्हाहोय ॥ पूर्णबोधाचा ॥७॥
नामाम्हणेसकळसंतमेळी ॥ कथासांगीतलीरसाळी ॥ तवज्ञानदेवाकरतळामळी ॥ समाधिशेजघातली ॥८॥