अभंग १२ - हस्तठेवीमाथया ॥ ज्ञानदेव...
हस्तठेवीमाथया ॥ ज्ञानदेवलागेपाया ॥ विठोजी म्हणेलवलाह्या ॥ समाधीसबैसावे ॥१॥
इंद्रचंद्रदेवयेती ॥ ब्रह्मादिकगाती ॥ यमवरुणबृहस्पती ॥ विमानेदाटतीअंतरीक्ष ॥२॥
तवपातलेगरुडदेव ॥ रुक्मिणीसत्यभामाभाव ॥ राहिमातागोपीसर्व ॥ समाधीज्ञानदेवपहावया ॥३॥
ब्रह्माइंद्रप्रजापती ॥ सर्वअंतरीक्षपहाती ॥ अळंकापुरियेश्रीपती ॥ हरुषचित्तीज्ञानदेवा ॥४॥
ऋषीमुनिगणगंधर्व ॥ पिशाचगुह्यकसर्व ॥ धृतअंबकऋषीमाधव ॥ चित्ती भावपहावया ॥५॥
ऐसीदाटलीविमाने ॥ हेसंत जाणतीज्ञाने ॥ ज्ञानदेवब्रह्महोणे ॥ हेचिदानविठ्ठलाचे ॥६॥
जयजयशब्देध्वनिगर्जे ॥ तेणेस्वर्गमृत्युपाताळगाजे ॥ पाताळीशेषम्हणेभुजे ॥ प्रेमेफुंजेनसमाये ॥७॥
नामाम्हणेशिवादिक ॥ सिद्धेश्वरीमिळालेसकळिक ॥ पहातीविठ्ठल कौतुक ॥ ज्ञानदेवसमाधीचे ॥८॥