अभंग १६ - पुष्पकविमानातळी ॥ हरीउतर...
पुष्पकविमानातळी ॥ हरीउतरलेभूतळी ॥ तवउदयोपूर्वमेळी ॥ सूर्याचा झाला ॥१॥
धन्यधन्य पृष्ठोत्तर ॥ धन्यधन्यतोतरुवर ॥ धन्यज्ञानदेवअवतार ॥ तीनीदेवप्रगटले ॥२॥
संतसनकादिकदेव ॥ आणिभक्तआलेसर्व ॥ स्नानेकरूयाभाव ॥ हरिचरणीठेविला ॥३॥
विलापमांडिलाभक्ती ॥ खंतीकरतीजगती ॥ ज्ञानदेवासारखीमूर्ती ॥ नदेखोम्हणतीदेवराया ॥४॥
देवम्हणतीनिवृत्ती ॥ तूप्रत्यक्षशिवमूर्ती ॥ तारावयाक्षिती ॥ अवतार धरिला ॥५॥
सोपानेघातलेलोटांगण ॥ मुक्तया धरिलेचरण ॥ संतकरितीस्तवन ॥ पांडुरंगरायाचे ॥६॥
मगसंबोखोनियाहरी ॥ सोपानदेवोधरिला करी ॥ निवृत्तीमस्तकावरी ॥ करकमळठेवीतसे ॥७॥
नाराविठापुढेचाले ॥ ऐसेइंद्रायणीसगेले ॥ सौंदडी वृक्षातळीबैसलेसपरिवारेसर्वभक्त ॥८॥
न्याहाळितीकासवदृष्टी ॥ ऐसाहरीचालतसृष्टी ॥ नामाहोतसेहिंपुटी ॥ ज्ञानदेवाकारणे ॥९॥