परमेश्वराची आरती
जयशिवशंकर, सर्वेशा । परमेश्वर, हरिहरवेषा ॥धृ०॥
कर्पुंरगौरा, शुभवदना । श्रीघननीळा, मधुसुदना
सदाशिव, शंभो, त्रिनयना । केशवाच्युता, अहीशयना
अखंड, मी शरण मदनदहना । दाखवी चरण गरुडवाहना
चाल - दयाळा हिमनगजामाता । कृपा कर श्रीलक्ष्मीकांता
स्तवितों दिनवाणि, पाव निर्वाणीं, गजेंद्रावाणि
सोडवी तोडुनि भवपाशा । धाव अविलंबें जगदीशा ॥जय.॥१॥
सुशोभितजटामुकुटगंगा । धृतपदालंच्छनभुजंगा
वामकरतलमंडितलिंगा । त्रिशुळ, जपमाळ, भस्म अंगा
निरंजन, निर्गुण, निःसंगा । सगुण रुप सुंदर आभंगा
चाल- क्षितितळवटीं जगदोद्धारा । करुणामृतसंगमधारा
जाहली प्रकट, चिंतितां लगट, शीघ्र सरसकट
करी नटखट चट गट क्लेशा । पालटवी प्राक्तनपटरेषा ॥जय० ॥२॥
लाविती कर्पुरदिप सांभा । आरती करिती पद्मनाभा
दिसतसे इंद्रभुवन शोभा , कीर्तनें होति, गाति रंभा
निरसुअ कामक्रोधलोभा । लाभति नर दुर्लभ लाभा
चाल- द्विजांच्या सहस्त्रावधि पंक्ति । प्रसादें नित्य तृप्त होती
चंद्रदिप भडके, वाद्यध्वनि धडके, पुढें ध्वज फडके
पतित जन होती निर्दोषा । ऐकुनि भजनाच्या घोषा ॥जय० ॥३॥
दीन ब्रिद वत्स वाढविणें । यास्तव रचिलें वाढवनें
प्रभुच्या चरणाश्रयिं रहाणें । वांच्छिति सनकादिक शाहणे
कशाला भागिरथिंत न्हाणें । तरि नको पंढरपुर पहाणें
पहातां समुळ दुःख विसरे । भुलोकीं वैकुंठचि दुसरें
गरुड-बैलास, वाटे कैलास, चढे उल्हास
विष्णुदास पावे हर्षा । करितां नमन आदिपुरुषा ॥जय० ॥४॥