शंकराची आरती - कर्पूर गिरिसम कांतिदशकर श...
कर्पूर गिरिसम कांतिदशकर शोभे शिरी गंगा ।
जवळी गणपति नृत्य करितो मांडुनिया रंगा ॥
अंकी अंबा सन्मुख नंदी सेविती ऋषी संगा ।
ब्रह्मादिक मूनि पूजा इच्छिती ध्याति अग्यंगा ॥
जय जय देवा आरती हरि हरेश्वरा । दयाळा ॥
काया वाचा मनोभावेम नमू परात्परा ॥ धृ . ॥
सुंदरपण किती वर्णूं रति - पति मदनाची मूर्ति ।
तेज पहातां संतृप्त होती कोटी गभस्ती ॥
वेदां नकळे पार जयाचा तो हा सुखमूर्ति ।
भक्तकाजकल्पद्रूम प्रगटे पाहूनियां भक्ति ॥
अंधक ध्वसुनी मेख विध्वंसुनी बलहत करी दक्षा ।
त्रिपुरा सुरशल मर्दूनि सुखकर खला करी शिक्षा ॥
तो तू अगुणी सगुण होसी भक्तांच्या पक्षा ।
धर्म स्थापुनि साधु रक्षिसी सूरांकृति दक्षा ॥
नारद तुंबर व्यास सुखादिक गाती सद् भावे ।
सनक सनंदन वशिष्ट वाल्मिक याना यश द्यावें ॥
चिन्मय रंगा भवभयभंगा हरि प्रिया धांवें ।
तवपद किंकर रामदास हा यासी नुपेक्षावे ॥