Get it on Google Play
Download on the App Store

शंकराची आरती - निर्गुणा निर्विकारा ॥ शिव...

निर्गुणा निर्विकारा ॥ शिवा कर्पूरगौरा ॥
व्यापुनी चराचरीं ॥ होसी प्रकृतीपरा ॥
अगणितकोटीलिंगे ॥ पुराणप्रसिद्ध बारा ॥
एक तरीं दृष्टीं पाहें । अन्यथा भूमीभारा ॥ १ ॥

जयदेवा नील कंठा सकलदेवां आदि श्रेष्टां ।
रंक मी शरण आलों ॥ निवारीं भवकष्टा ॥ धृ. ॥

सोरटीसोमनाथ ॥ जगीं एक विख्यात ॥
तयाच्या दर्शनें हो ॥ चुके संसारपंथ ॥
हिमवंतपृष्ठभागीं ॥ लिंगकेदार मुक्त ॥
साधुसंत सेविताती ॥ धरुनि कैवल्यहेत ॥ जय. ॥ २ ॥

उज्जयिनी नामपूरीं ॥ पवित्र सचराचरीं ॥
महाकाळ लिंग जेथें । धन्य जो पूजा करी ॥
ओंकारमहाबळेश्वर ॥ ज्योतिर्लिंग निर्धारी ॥
तयाच्या दर्शने हो जन्ममरण निवारी ॥ जय. ॥  ३ ॥

पश्चिमें लिंग एक ॥ जया नाम त्र्यंबक ॥
गौतमी उगम जेथें ॥ वाहे मंगलदायक ॥
दर्शने स्नान मात्रे ॥ पुण्यपावन लोक ॥
तैसाच घृष्णेश्वर ॥ सेवाळें रमणीक ॥ जय. ॥ ४ ॥

भीमेचा उगम जेथें । भीमाशंकर तेथें ॥
डांकिनी स्नान करिती ॥ लिंग म्हणती तयातें ॥
अगणित पुण्य जोडे ॥ चालतांची तेणे पंथें ॥
दक्षिणे रामेश्वर ॥ ज्योतिर्लिंग म्हणती त्यातें ॥ जय. ॥ ५ ॥

आवंढ्यानागनाथ ॥ देव आपण नांदत ॥
भक्त जन कुटुंबिया भुक्तिमुक्तिदायक ॥ प्रत्यक्ष लिंग जेथें परळीवैजनाथ ।।
हरिहर तिथें ॥ जन होत कृतार्थ ॥ जय. ॥ ६ ॥

श्रीशैल तो पर्वत ॥ लिंगरुप समस्त ॥
सभोवती नीळगंगा ॥ माजी श्रीमल्लीनाथ ॥
भूमीकैलास दूजा ॥ जन साक्ष दावीत ॥
साठिवरुपें वाट पाहे ॥ कृपाळुं तो उमाकांत ॥ जय. ॥ ७ ॥

धन्य हो काशिपुरी मणिकर्णिकातीरी ॥ विश्वेश्वरलिंग जेथें ॥
जीवमात्रा उद्धरी ॥ तारक ब्रह्ममंत्र ॥ जपे कर्णविवरी ।
तेणेंची मोक्षपद ॥ प्राप्त होय निर्धारी ॥ जय. । ८ ॥

येऊनियां संसारा ॥ माजी ज्योतिर्लिंगें बारा ॥
एक तरी दृष्टीं पाहें ॥ अन्यथा भूमिभारा ॥
विश्वेश्वर विश्वनाथ ॥ भावभक्ति निर्धारा ॥
नामया श्रीशिवदास ॥ ध्याय परात्परा जयदेवा नीलकंठा ॥ ९ ॥

शंकर आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
शंकराची आरती - लवलवथी विक्राळा ब्रह्मांड... शंकराची आरती - कुलदैवत तूं मेरी सेवक मै ... शंकराची आरती - जय जय जय शिव शंभो गंगाधर ... शंकराची आरती - जय जय जय मृड शंभो सतंत कु... शंकराची आरती - भस्मप्रिया भूतपते सदय शंक... शंकराची आरती - जयजयजी मदनांतक गौरीशंकरा ... शंकराची आरती - महाजी महादेव ॥ महाकाळमर्द... शंकराची आरती - कर्पूरगौरा गौरीशंकरा आरति... शंकराची आरती - सद्यो जातं प्रपद्यामितिस्... शंकराची आरती - जय जय आरती पार्वती रमणा ॥... शंकराची आरती - महारुद्रा जगन्नाथा शिवाभो... शंकराची आरती - शंभो शिवहर गौरी स्मरहर जय... शंकराची आरती - अभिनव सुंदर गंगाकाशी पुरव... शंकराची आरती - गौरीवर गंगाधर तनु कर्पूरऎ... शंकराची आरती - अर्धांगी हे तुझे पार्वती ... शंकराची आरती - निर्गुणा निर्विकारा ॥ शिव... शंकराची आरती - आरती रत्नेश्वराची । करु य... शंकराची आरती - कर्पूर गिरिसम कांतिदशकर श... शंकराची आरती - जय देव जय देव सोमनाथा । ... शंकराची आरती - जगशिवशंकर गंगाधर गौरी कां... शंकराची आरती - भस्मासुरां करिसी स्ववराने... शंकराची आरती - मंगेश महारूद्रा जय पार्वत... शंकराची आरती - जय देव जय देव जय आदि पुरू... शंकराची आरती - जय देवा धूतपापा । आतां सं... शंकराची आरती - मस्तकि जान्हूतनया विमलार्... शंकराची आरती - जय देव जय देव श्रीमंगेशा ... शंकराची आरती - उपमा नाही रूपी निर्गूणगुण... शंकराची आरती - जय जय त्र्यंबकराज गिरिजान... शंकराची आरती - शुक्रेश्वर सिद्धेश्वर शंभ... शंकराची आरती - आरती चंद्रशेखराची । अंबि... शंकराची आरती - जय देव जय देव वंदे तं गिर... शंकराची आरती - जय देव जय देव जय जी मंगेश... शंकराची आरती - जय देव जय देव जयगिरिजारमण... शंकराची आरती - जय देव जय देव जय शंकर सां... शंकराची आरती - वृषवाहन वृंदारक वृंदकवर श... शंकराची आरती - शिव सांब शिव सांब शिव धूत... शंकराची आरती - जय जय नाथ निरामय शिव शिव ... शंकराची आरती - आरती परम ईश्वराची । दिगं... शंकराची आरती - जय देव जय देव जन रतिपतिदह... आरती शिवाची - जय जय वो शिवसांबा अंबादेव... आरती शंकराची - जयजय शिवशंकरा कर्पुरगौरा ... आरती शंकराची - जयदेव जयदेव जयजय शिवसांबा... कालभैरवाची आरती शंकराची आरती - जय जय शिवशंभो , शंकरा । ह... शंकराची आरती - जय जय शिव शिव शिव शंभुशं... परमेश्‍वराची आरती