Android app on Google Play

 

शंकराची आरती - जय जय शिवशंभो , शंकरा । ह...

 

जय जय शिवशंभो, शंकरा । हर, हर कर्पुंरगौरा ॥धृ०॥

अघटित घटित कृती तुझि सारी । विश्‍वंभर, संसारी

तुंबळजळगंगासहित शिरीं । प्रलयानळ तेजःश्री

केवळ निळकंठ विषधारी । चंद्रामृत रसधारी

लंपट अर्धांगी प्रिय नारी । अससी परी मदनारी

समान अहिमुषकासनमयुरा । गणपति-स्कंदकुमारा ॥१॥

अनंत ब्रम्हांडांच्या माळा । फिरविसि अनंत वेळा

सच्चिदानंद तुझी कळा । न कळे, भ्रम पदे सकळां

किंचित् जाणील तो नर विरळा । ब्रह्मांडामधिं आगळा

ब्रह्मज्ञानाच्या विशाळा । अभ्यासाच्या शाळा

नेणुनि बहु करती पुकारा । मूळाक्षर ॐकारा ॥२॥

आज्ञेविण न हले तृण, पाणी । पवनगजज्जिववाणी

भ्रमतीं नक्षत्रें शशितरणी । पन्नग, शिरिंधरी धरणी

खग-मृग-तरु-कीटक जडप्राणी । वर्तति ज्या अनुसरुनी

स्वतंत्र तो तूंची, तुझी करणी । शिव, शिव, हे शुळपाणी

अनाथ दीनांचा तूं आसरा । लोकत्रयिं नसे दुसरा ॥३॥

शरणागत आलों पायांस । संरक्षण करि यास

अखंड रक्षिसि तूं । विश्‍वास । आहे बहु विश्‍वास

सदैव हृत्कमलीं करि वास । एवढी पुरवी आस

आशा न करावी उदास । बोले विष्णूदास

अनंत भूलिंगा अवतारा । भवनिधिपार उतारा ॥४॥

 

शंकर आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
शंकराची आरती - लवलवथी विक्राळा ब्रह्मांड...
शंकराची आरती - कुलदैवत तूं मेरी सेवक मै ...
शंकराची आरती - जय जय जय शिव शंभो गंगाधर ...
शंकराची आरती - जय जय जय मृड शंभो सतंत कु...
शंकराची आरती - भस्मप्रिया भूतपते सदय शंक...
शंकराची आरती - जयजयजी मदनांतक गौरीशंकरा ...
शंकराची आरती - महाजी महादेव ॥ महाकाळमर्द...
शंकराची आरती - कर्पूरगौरा गौरीशंकरा आरति...
शंकराची आरती - सद्यो जातं प्रपद्यामितिस्...
शंकराची आरती - जय जय आरती पार्वती रमणा ॥...
शंकराची आरती - महारुद्रा जगन्नाथा शिवाभो...
शंकराची आरती - शंभो शिवहर गौरी स्मरहर जय...
शंकराची आरती - अभिनव सुंदर गंगाकाशी पुरव...
शंकराची आरती - गौरीवर गंगाधर तनु कर्पूरऎ...
शंकराची आरती - अर्धांगी हे तुझे पार्वती ...
शंकराची आरती - निर्गुणा निर्विकारा ॥ शिव...
शंकराची आरती - आरती रत्नेश्वराची । करु य...
शंकराची आरती - कर्पूर गिरिसम कांतिदशकर श...
शंकराची आरती - जय देव जय देव सोमनाथा । ...
शंकराची आरती - जगशिवशंकर गंगाधर गौरी कां...
शंकराची आरती - भस्मासुरां करिसी स्ववराने...
शंकराची आरती - मंगेश महारूद्रा जय पार्वत...
शंकराची आरती - जय देव जय देव जय आदि पुरू...
शंकराची आरती - जय देवा धूतपापा । आतां सं...
शंकराची आरती - मस्तकि जान्हूतनया विमलार्...
शंकराची आरती - जय देव जय देव श्रीमंगेशा ...
शंकराची आरती - उपमा नाही रूपी निर्गूणगुण...
शंकराची आरती - जय जय त्र्यंबकराज गिरिजान...
शंकराची आरती - शुक्रेश्वर सिद्धेश्वर शंभ...
शंकराची आरती - आरती चंद्रशेखराची । अंबि...
शंकराची आरती - जय देव जय देव वंदे तं गिर...
शंकराची आरती - जय देव जय देव जय जी मंगेश...
शंकराची आरती - जय देव जय देव जयगिरिजारमण...
शंकराची आरती - जय देव जय देव जय शंकर सां...
शंकराची आरती - वृषवाहन वृंदारक वृंदकवर श...
शंकराची आरती - शिव सांब शिव सांब शिव धूत...
शंकराची आरती - जय जय नाथ निरामय शिव शिव ...
शंकराची आरती - आरती परम ईश्वराची । दिगं...
शंकराची आरती - जय देव जय देव जन रतिपतिदह...
आरती शिवाची - जय जय वो शिवसांबा अंबादेव...
आरती शंकराची - जयजय शिवशंकरा कर्पुरगौरा ...
आरती शंकराची - जयदेव जयदेव जयजय शिवसांबा...
कालभैरवाची आरती
शंकराची आरती - जय जय शिवशंभो , शंकरा । ह...
शंकराची आरती - जय जय शिव शिव शिव शंभुशं...
परमेश्‍वराची आरती