Get it on Google Play
Download on the App Store

भविष्य धोक्यात आहे! २

प्रकाशचे नागलोकी आगमन झाले होते, आपल्या उपस्थितीची चाहूल कोणालाही लागू नये म्हणून तो अदृश्य होऊनच तिथे वावरणार होता. बऱ्याच वर्षांपूर्वी नागराजने त्याचे अपहरण करून त्याला नागलोकी आणल्यानंतर इतक्या वर्षांनी तो आज तिथे आला होता. त्या वेळी त्याला तिथे त्याच्या इच्छेविरुद्ध आणले गेले होते. परंतु आज तोच प्रकाश तिथे स्वइच्छेने आला होता. आधीच्या वेळी त्याचे बल्ल आणि मल्लने अपहरण करून, त्याला तिथे बंदी बनवून आणले होते. साहजिकच त्यावेळी त्याला नागलोक पूर्णपणे बघता आला नव्हता. म्हणूनच आज तो नागलोकाचे शक्य तितके चांगले निरीक्षण करणार होता. नागलोकी सर्वत्र गडद अंधाराचे साम्राज्य पसरले होते. हे बघून ह्या ठिकाणी खरोखरच सूर्याची किरणे पोहोचू शकत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तरीही त्याला आपल्या नागशक्तींमुळे संपूर्ण नागलोक स्पष्टपणे दिसू शकत होते.

त्या ठिकाणी त्याला जागोजागी एकाच विशिष्ट पद्धतीची कलाकुसर असलेल्या लहान मोठ्या आकाराच्या वास्तू दिसत होत्या. त्या वास्तू म्हणजे नागांचे निवासस्थान असणार हे त्याने लगेचच ओळखले. त्या वास्तूंचा आकार लहानमोठा असल्याने मनुष्याप्रमाणेच नागांमध्येही समानता नाही, ही गोष्ट स्पष्ट होती. नागांची ती निवासस्थाने पृथ्वीवरील मनुष्यांच्या घरापेक्षा कितीतरी पटींनी भव्य असूनही सुटसुटीत जागा सोडून निर्माण केलेली होती. प्रत्येक वास्तूभोवती पृथ्वी वरील खेड्या-पाड्यात दिसतात त्याप्रमाणे विविध प्रकारची झाडे लावण्यात आलेली होती. ती झाडेसुद्धा पृथ्वीवरील झाडांच्या तुलनेत कैक पटींनी मोठी असून त्याच्यात पृथ्वीवरील झाडांच्या तुलनेत काहीसे वेगळेपण होते. नागलोकाचे निरीक्षण करत असताना,प्रकाशला जागोजागी सर्वत्र अशाच प्रकारची रचना असलेली नागांची निवासस्थाने दिसत होती. तिथे असाच गुप्तपणे फिरता फिरता तो एका भव्य वास्तूजवळ येऊन थांबला. त्या वास्तूच्या भव्य-दिव्य आकारावरून नक्कीच तो राजमहाल असणार ही गोष्ट प्रकाशच्या लक्षात आली होती. किती सुंदर वास्तू होती ती! त्या वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी चारही दिशांना भव्य प्रवेशद्वार होते. त्या प्रवेशद्वारावर जागोजागी नक्षीकाम तर होतेच. परंतु त्यावर चमकणारी रत्नेही बसवण्यात आलेली होती. राजमहालात हवा खेळती राहण्यासाठी जागोजागी मोठमोठ्या खिडक्या होत्या. त्या खिडक्यांचाच आकार जवळपास शंभर फुट असावा आणि दरवाजे तर त्यांच्यापेक्षाही जवळपास तीन पट मोठे होते. प्रत्येक प्रवेशद्वारासमोर पहारा देण्यासाठी काही नागसैनिक उभे होते. त्या महालाच्याही आजूबाजूला हजारोंच्या संख्येने वृक्ष लावण्यात आले होते. यावरून नागांचे वृक्षप्रेम स्पष्ट होत होते. त्या भव्य दिव्य महालाचे अप्रतिम कलाकुसर असणारे सौंदर्य पाहत तो आतून कसा दिसत असेल, त्याची आतील रचना कशी असेल या गोष्टीचा विचार करत प्रकाश आपल्या मार्गाने पुढे-पुढे चालत होता.

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य मनोगत पार्श्वभूमी अपहरण १ अपहरण २ अपहरण ३ अपहरण ४ अपहरण ५ अपहरण ६ अपहरण ७ अपहरण ८ खरी ओळख १ खरी ओळख २ खरी ओळख ३ शोध सुरु आहे... १ शोध सुरु आहे... २ स्वप्न की सत्य? १ स्वप्न की सत्य? २ अपहरणाचे रहस्य १ अपहरणाचे रहस्य २ अपहरणाचे रहस्य ३ अपहरणाचे रहस्य ४ नागांची रहस्ये १ नागांची रहस्ये २ नागांची रहस्ये ३ युद्धाची तयारी १ युद्धाची तयारी २ युद्धाची तयारी ३ युद्धाची तयारी ४ युद्धाची तयारी ५ युद्धाची तयारी ६ युद्धाची तयारी ७ युद्धाची तयारी ८ मोहनचे रहस्य हिमालयात आगमन...१ हिमालयात आगमन...२ प्रकाशची गोष्ट १ प्रकाशची गोष्ट २ प्रकाशची गोष्ट ३ संकटाची चाहूल १ संकटाची चाहूल २ संकटाची चाहूल ३ संकटाची चाहूल ४ संकटाची चाहूल ५ भविष्य धोक्यात आहे! १ भविष्य धोक्यात आहे! २ भविष्य धोक्यात आहे! ३ भविष्य धोक्यात आहे! ४ उत्पत्तीची रहस्ये "स्वरुप बदलते!" पुनर्जन्म १ पुनर्जन्म २ पुनर्जन्म ३ विकासाची रहस्ये १ विकासाची रहस्ये २ विकासाची रहस्ये ३ भूतकाळातील घटनाक्रम १ भूतकाळातील घटनाक्रम २ तिच्या स्मृती १ तिच्या स्मृती २ तिच्या स्मृती ३ तिच्या स्मृती ४ तिच्या स्मृती ५ सत्यातील असत्यता १ सत्यातील असत्यता २ सत्यातील असत्यता ३ सत्यातील असत्यता ४ सत्यातील असत्यता ५ सत्यातील असत्यता ६