Android app on Google Play

 

खरी ओळख ३

 

प्रकाश ध्यानातून नुकताच बाहेर आला होता. त्याच्या समोर बसलेल्या मोहनरावांना पाहून तो आश्चर्यचकित झाला. “तुम्ही इथे कसे?’’ असा प्रश्न त्याने मोहनला केला त्यावर ‘’का? एक बाप आपल्या मुलाला भेटण्यासाठी येऊ शकत नाही?’’ मोहनने त्याला विचारले. “नाही, मला तसे म्हणायचे नव्हते,” मोहनराव त्याचे खरे पिता असल्याचे त्याला हल्लीच समजले होते.

इतकी वर्ष तो वसंतरावांना आणि लताला आपले माता-पिता मानत आला होता. पण आता त्याला सत्य कळले होते.

इतकी वर्ष त्याचे जीवन एका सामान्य मुलासारखेच व्यवस्थित चालत होतं. पण नागांकडून झालेल्या त्याच्या अपहरणानंतर त्याच्या समोर एक-एक करत त्याच्या जीवनाची सर्व रहस्ये उलगडत चालली होती. त्या अपहरणानंतरच त्याला स्वत:ची ओळख होऊ लागली होती. आतापर्यंतच्या त्याच्या जीवनात त्याला आलेल्या काही चित्र-विचित्र अनुभवांचा अर्थ आता कुठे त्याला समजू लागला होता. त्याचे गुढ गोष्टींविषयी असलेले आकर्षण, त्याला पडणारी अर्थहीन भयानक आणि विचित्र स्वप्ने. त्याच्या येण्याची चाहूल लागताच कुत्र्यांच्या, मांजरीच्या वागण्यात लगेच होणारा बदल, त्याला राग येताच त्याच्या शरीराचे वाढणारे तापमान अशा कितीतरी गोष्टींचा संबंध त्याच्या ‘नाग’ असण्यासाशीच निगडीत होता. हे त्याच्या आता लक्षात आले होते. तरीही सत्य समजल्यावर सुरुवातीला आपण कोणी सामान्य मनुष्य नसून अलौकिक शक्ती असलेला इच्छाधारी नाग आहोत,हे सत्य पचवणे त्याला खुपच जड गेले होते. इतकी वर्ष तो आपल्या मनामध्ये स्वतःची जी ओळख बाळगून होता, ती ओळख एका घटनेनंतर त्याच्या मनातून पूसली गेली होती. आपण एक नाग आहोत, हे कळल्यानंतर त्याला फार मोठा धक्का बसला होता. पण त्या धक्क्यापेक्षा त्याच्या मनात स्वतःबद्दल अधिक कुतुहूल निर्माण झाले. स्वतःबद्दल अधिक जाणून घेण्याची त्याच्या मनातील तीव्र इच्छा त्याला आता स्वस्थ बसून देणारी नव्हती. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला ध्यानातूनच मिळू शकतात. असे त्याला फार वाटे. एका अर्थी ते सत्यही होते. ध्यानातून त्याला होणारी दिव्य अनुभुती आणि त्यातून त्याला मिळणारे समाधान ह्या सर्व गोष्टी विलक्षणच होत्या. खरेतर प्रकाश लहान असतानाच या सर्व अद्भूत गोष्टी घडण्याची सुरुवात त्याच्या जीवनात झाली होती.

ज्यावेळी त्याने गावातील मंदिरात एका व्यक्तीला ध्यानधारणा करताना पाहिले, त्याच वेळी त्याच्या मनात ध्यानधारणेविषयी कुतुहुलाबरोबरच आकर्षणही निर्माण झाले. त्यामुळेच तोसुद्धा ध्यान करण्यासाठी प्रेरित झाला होता. त्याचवेळी ध्यानाच्या माध्यमातून त्याने स्वतःचा शोध घेणे सुरु केले होते. ध्यानामुळे त्याला आजवर त्याच्या मनातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. पण तरीही त्याच्या मनात स्वतःबद्दलचे बरेचशे प्रश्न अजुनही शिल्लक होते. म्हणून तो थोडा अस्वस्थ होता.

मोहन त्याला त्याच्या आजोबांशी त्यांची भेट करून देण्याकरता, त्याला तिथून नेण्यासाठी आला होता. आजवर मोहन आणि अनंताने त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवले नव्हते. जाणीवपूर्वक ते दोघे प्रकाशपासून लांब राहिले होते. पण आता मात्र परिस्थिती बदलली होती. आता प्रकाशला त्याची खरी ओळख पटली होती. त्यामुळे त्याचे योग्य मार्गदर्शन करणे हे मोहन आणि अनंताचे कर्तव्य होते. अन्यथा त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची त्या दोघांनाही जाणीव होती आणि भीतीसुद्धा.
 

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य
मनोगत
पार्श्वभूमी
अपहरण १
अपहरण २
अपहरण ३
अपहरण ४
अपहरण ५
अपहरण ६
अपहरण ७
अपहरण ८
खरी ओळख १
खरी ओळख २
खरी ओळख ३
शोध सुरु आहे... १
शोध सुरु आहे... २
स्वप्न की सत्य? १
स्वप्न की सत्य? २
अपहरणाचे रहस्य १
अपहरणाचे रहस्य २
अपहरणाचे रहस्य ३
अपहरणाचे रहस्य ४
नागांची रहस्ये १
नागांची रहस्ये २
नागांची रहस्ये ३
युद्धाची तयारी १
युद्धाची तयारी २
युद्धाची तयारी ३
युद्धाची तयारी ४
युद्धाची तयारी ५
युद्धाची तयारी ६
युद्धाची तयारी ७
युद्धाची तयारी ८
मोहनचे रहस्य
हिमालयात आगमन...१
हिमालयात आगमन...२
प्रकाशची गोष्ट १
प्रकाशची गोष्ट २
प्रकाशची गोष्ट ३
संकटाची चाहूल १
संकटाची चाहूल २
संकटाची चाहूल ३
संकटाची चाहूल ४
संकटाची चाहूल ५
भविष्य धोक्यात आहे! १
भविष्य धोक्यात आहे! २
भविष्य धोक्यात आहे! ३
भविष्य धोक्यात आहे! ४
उत्पत्तीची रहस्ये
"स्वरुप बदलते!"
पुनर्जन्म १
पुनर्जन्म २
पुनर्जन्म ३
विकासाची रहस्ये १
विकासाची रहस्ये २
विकासाची रहस्ये ३
भूतकाळातील घटनाक्रम १
भूतकाळातील घटनाक्रम २
तिच्या स्मृती १
तिच्या स्मृती २
तिच्या स्मृती ३
तिच्या स्मृती ४
तिच्या स्मृती ५
सत्यातील असत्यता १
सत्यातील असत्यता २
सत्यातील असत्यता ३
सत्यातील असत्यता ४
सत्यातील असत्यता ५
सत्यातील असत्यता ६