अपहरणाचे रहस्य २
नागराज नागासनावर बसला होता. त्याच्या शेजारीच त्याच्याबरोबर नागराणी बसली होती. नागतपस्वी आणि नागऋषीही तिथेच उपस्थित होते. तितक्यात बल्ल आणि मल्ल हे दोन नाग तिथे प्रकाशला घेऊन आले. गुंगीच्या औषधाच्या प्रभावाने प्रकाश अजूनही मुर्च्छित अवस्थेत होता. त्यांनी त्याला नागराजाच्या समोर आणून ठेवले. नागराजने त्याच्यावर दृष्टीक्षेप टाकला. काही क्षण त्याने प्रकाशला निरखून बघितले आणि मिश्किलपणे स्मितहास्य केले. “ह्याला ताबडतोब मुर्छेतून बाहेर काढा.” त्याने आपल्या सेवकांना आज्ञा दिली. लगेचच एक नाग सेवक तिथे आला आणि त्याने कुठल्यातरी मंत्राच्या उच्चाराने प्रकाशवरील गुंगीच्या औषधाचा प्रभाव कमी केला. तसे लगेचच प्रकाशने आपले डोळे उघडले. इतका काळ औषधाच्या प्रभावाखाली असल्यामुळे आपल्याबरोबर नेमके काय घडले आहे, हे त्याच्या लक्षात येत नव्हते.
प्रकाशने डोळे उघडताच क्षणी त्याच्या दृष्टीस असंख्य नाग उपस्थित होते. त्यामुळे तो फारच भयभीत झाला. आपण कुठल्यातरी भयंकर मोठ्या संकटात सापडल्याची त्याला जाणीव झाली. आपल्याजवळील उरले-सुरलेले धैर्य एकवटून तो कसाबसा उभा राहिला. त्याच्या समोरच एक भलामोठा नाग नागासनावर बसला होता. त्याच्या बाजूला अजून एक नाग दुसऱ्या आसनावर बसला होता. त्याने आपली दृष्टी बाजूला वळवली, तसे त्याच्या दृष्टीस हजारो लहान मोठे नाग दिसू लागले. पण ते सर्व उभे होते. त्यांना बसण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या आसनाची सोय नव्हती.त्यामुळे सामोर बसलेले ते दोन नाग यांचे राजा आणि राणी असावेत असा अंदाज त्याने बांधला.
आत्तापर्यंत तो भयभीत नजरेने त्या अंधाऱ्या आणि भयावह असणाऱ्या विचित्र ठिकाणचे आणि तिथल्या असंख्य नागांचे निरीक्षण करत होता. तितक्यातच, “तू कोण आहेस याची जाणीव तरी आहे का तुला?” नागराजने प्रश्न केला. आयुष्यात प्रथमच, कोणी कल्पनाही करू शकणार नाही इतका मोठा नाग त्याने पहिला होता. आणि आता तर तो नाग त्याच्याशी मानवी भाषेत बोलत होता. त्यामुळे भयभीत झालेल्या प्रकाशला काही सुचेनासे झाले होते. तो एकदम स्तब्ध होऊन समोरील दृश्य शांतपणे उघड्या डोळ्यांनी पाहत होता. त्याचे मौन बघून नागराज अधिकच चिडला. “मी तुझ्याशी बोलत आहे, मूर्ख मनुष्य.” तो मोठ्याने ओरडला. त्याचे शब्द कानावर पडताच, प्रकाशने स्वतःला सावरले आणि तो दबक्या आवाजात त्याच्याशी बोलू लागला. “मी... प्रकाश... तुम्ही मला इथे कुठे आणले आहे? हे सर्व काय सुरु आहे?आणि तुम्ही सर्व कोण आहात?” असे एक-एक करत तो त्याला प्रश्न विचारू लागला. नागराजने दिलेल्या त्याच्या प्रश्नांची उत्तरे ऐकून तो अधिकच भयभीत झाला. नागराजच्या म्हणण्यानुसार तो सुद्धा एक नाग होता. साहजिकच त्याच्या बोलण्यावर सुरुवातीला प्रकाशचा विश्वास बसला नव्हता. एखादा मनुष्य नाग कसा काय असू शकतो याचा विचार तो करू लागला. आणि क्षणार्धातच हे सर्व खोटे असल्याच्या निष्कर्षावर तो पोहोचला. त्यानंतर नागराजने त्याला त्याच्या आजोबांची म्हणजे अनंताची कथा सांगितली. पण त्यावेळी तो अशा कुठल्याही व्यक्तीला ओळखत नसल्याने, त्याचा त्या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता. अनंताचा मुलगा मोहन हाच तुझा जन्मदाता पिता असल्याचेही त्याला सर्वप्रथम नागराजकडून समजले होते. परंतु त्यावेळी त्याला त्याच्या बोलण्यावर काडीचाही विश्वास नव्हता. त्यावेळी प्रथमच भेटलेल्या, त्या बोलणाऱ्या नागावर तो विश्वास ठेवूच शकला नसता. “तुम्ही ज्या काही काल्पनिक गोष्टी मला सांगत आहात, त्यांचाशी मला काहीही देणे-घेणे नाही. तुम्ही माझी इथून मुक्तता करा.” प्रकाश थोडा चिडून म्हणाला. त्यावर नागराज दृष्टतेने सैतानासारखा हसला. “तुला आमचे बोलणे खोटे वाटले? अरे तू देखील आमच्यासारखाच एक नाग आहेस, तुझे पिता आणि आजोबाही नाग वंशातलेच आहेत.” तो तिरस्काराने म्हणाला.
प्रकाशचा त्या अंधारमय आणि कोंडत जागेत जीव घुसमटत होता. त्याला श्वास घेणे कठीण जात होते. “तुम्ही माझी इथून सुटका करा. मी एक सामान्य मनुष्य आहे.” तो विनवणी करत होता. नागराजने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याने “नागतपस्वी, नागऋषी... मी या विचित्र जीवाचे काय करू?” म्हणून विचारले. नागतपस्वी चिंतेत दिसत होते. ते काहीच बोलले नाहीत. त्यांच्यासमोर सर्वकाही विपरीत घडत होतं. म्हणून ते शांत होते. पण नागऋषी मात्र प्रकाशकडे क्रोधीत नजरेने पाहत होते. “नागराज तू ह्या मनुष्याला आत्ताच संपवून टाक, नाहीतर तो पुढे आपल्या मार्गातील काटा बनेल.” आणि कदाचित आपला वंश नष्ट करण्यास कारणीभूतही ठरेल.” नागऋषी क्रोधाने म्हणाले. “पण हा पूर्णपणे मनुष्य नाही, तो आपल्यापैकीच एक आहे. किंबहुना तो आपल्यापेक्षाही श्रेष्ठ नाग आहे. त्यामुळे भविष्यात त्याच्याकडून आपल्या वंशाच्या हिताचेही कार्य घडू शकते. त्यामुळे त्याची हत्या करणे योग्य ठरणार नाही.” नागतपस्वी पटकन बोलून गेले.
नागराज आता थोडा गोंधळला. ‘प्रकाशचे’ काय करावे, त्याला कळत नव्हते. “नागराज तू ह्या वृद्धाचे काहीही ऐकू नकोस. वृद्धत्वामुळे त्याची बुद्धी क्षीण झाली आहे. हा जीव आपल्या वंशाचे रक्षण नाही तर भक्षण करण्यास कारणीभूत ठरेल. त्यामुळे तू आत्ताच त्याला मृत्युदंड दे.” नागऋषी म्हणाले.
त्यांचे संभाषण ऐकून प्रकाश खूप घाबरला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आता आपला मृत्यू होऊ शकतो.’ ह्या विचाराने तो बेचैन झाला. अशा स्थितीत काय करावे त्याला सुचत नव्हते. मृत्युच्या विचाराने त्याच्या मेंदूला बधिरता आली होती. नागराज, नागतपस्वी आणि नागऋषींचे बोलणे ऐकून, तिथे उपस्थित असलेले नाग आपापसात बारीक आवाजात कुजबुजत होते. पण त्यांची भाषा प्रकाशला समजण्यापलीकडची होती. “शांत व्हा सर्वांनी...” नागराज बोलू लागला, “माझा निर्णय झाला आहे. या विचित्र जीवाला मृत्युदंडच देण्यात येईल. भविष्यात त्याचे आपल्याला सहाय्य होईल. अशी आशा करणे व्यर्थ आहे. तो जरी आपल्या नागवंशातला असला तरी तो एक मनुष्यही आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. स्वार्थी व धूर्त मनुष्यावर विश्वास ठेवण्याची जी चूक आमच्या पूर्वजांनी केली, ती मी पुन्हा करणार नाही. त्यामुळे नागप्रजातीच्या हितासाठी सर्व नागांच्या वतीने मी ह्या जीवाला मृत्युदंड देण्याचे घोषित करतो.” आत्तापर्यंत नागराणी शांतपणे बसून सर्व पाहत होती. पण नागराजने प्रकाशला मृत्युदंड देण्याची घोषणा करताच, तिनेही नागराजच्या निर्णयाला सहमती दर्शवली. नागतपस्वी नाईलाजाने शांतपणे सर्वकाही पहात होते. त्यांच्या वृद्धत्वामुळे नागराजाला विरोध करण्याची ताकद त्यांच्याकडे नव्हती.
“बल्ल, तू ह्या मनुष्याचे मस्तक त्याच्या धडावेगळे करावेस ही माझी तुला आज्ञा आहे.” नागराज उत्स्फुर्तपणे म्हणाला. तिथेच उभा असलेला ‘बल्ल’ क्षणांचाही विलंब न करता तत्परतेने नागराजजवळ आला. त्याने क्षणार्धात आपल्या मंत्रशक्तीने एक दिव्य तलवार निर्माण केली आणि तो प्रकाशच्या दिशेने वळला. आता मृत्यू जवळ आला हे जाणून प्रकाश तिथून पळण्याच्या प्रयत्नात होता.तितक्याच ‘मल्ल’ त्याच्या जवळ गेला आणि त्याने प्रकाशभोवती विळखा घातला. प्रकाशला आता हलता येणेही शक्य नव्हते. त्या नागाने प्रकाशला इतक्या जोराने आवळले होते की प्रकाशचा रक्तप्रवाह जवळ जवळ थांबलाच होता. त्याला आता श्वास घेणेही फार कठीण झाले. तितक्यात बल्ल तलवार घेऊन त्याच्याजवळ आला. तसे प्रकाशने आपले डोळे भीतीने मिटले. बल्लने आपल्या हातातील तलवार वर उचलून तिचा एक जोरदार प्रहर प्रकाशच्या मानेवर केला. तिथे उपस्थित सर्व नाग हा सर्व प्रकार आपला श्वास रोखून पाहत होते. आत्तापर्यंत त्यांच्यातील बहुसंख्य नागांनी मनुष्याबद्दल त्यांच्या पूर्वजांकडून फक्त ऐकले होते. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी कधी मनुष्याला पहिले नव्हते. त्यामुळे तिथे उपस्थित सर्वांचे लक्ष्य प्रकाशकडेच होते.
तेवढ्यात, दोन धातू एकमेकांवर आदळावेत अशा प्रकारचा ध्वनी सर्वांना ऐकू आला. बल्लने तलवारीचा जोरदार प्रहर प्रकाशच्या मानेवर केला तेव्हा तो ध्वनी निर्माण झाला होता. हे सर्वांसाठीच एक आश्चर्य होते. जसे प्रकाशच्या मानेभोवती कसलेतरी अभेद्य कवच असावे अशी बल्लला जाणीव झाली. म्हणून त्याने पुन्हा एकदा प्रकाशच्या मानेवर तलवारीचा प्रहर केला. पण पुन्हा तेच घडले…. प्रकाशला काहीही झाले नव्हते. बल्ल आता खूप चिडला होता. त्यामुळे तो प्रकाशच्या मानेवर सारखे सारखे तलवारीचे प्रहार करु लागला. पण त्याचे सर्व वार व्यर्थ ठरत होते. प्रकाशने आता आपले डोळे उघडले. तितक्यात बल्लने पुन्हा एक प्रहार प्रकाशच्या मानेवर केला. क्षणार्धात प्रकाशने पुन्हा आपले डोळे मिटले. पण पुन्हा तेच..... तो प्रहारही व्यर्थ ठरला. तसे नागतपस्वी मोठ-मोठ्याने मिश्किलपणे हसू लागले. त्यांच्या अशाप्रकारे हसण्याचा नागराजला खूप राग आला होता. पण तो त्यांना काही बोलण्याच्या आतच नागतपस्वी बोलू लागले, “मी तर विसरलोच होतो की, हा कोणी सामान्य मनुष्य अथवा सामान्य नाग नाही. तर हा मनुष्यरुपात दिव्य नागमणी घेऊन जन्माला आलेला एक दिव्य आत्मा आहे. त्याच्या मस्तकावर असलेल्या नागमणीमुळे त्याच्यावर कुठल्याही शस्त्राचा, विषाचा किंवा प्राणघातक मंत्राचा काहीही परिणाम होणार नाही, परमेश्वराने आपल्याला जवळपास दहा हजार वर्षे जगता येईल इतके आयुष्य दिले आहे तर आजच्या मनुष्याला फार फारतर फक्त शंभर वर्षाचे आयुष्य लाभले आहे. पण हा कोणी सामान्य मनुष्य अथवा सामान्य नाग नसल्यामुळे, ह्याला आपल्यापेक्षाही सहस्त्र पटींनी अधिक आयुष्य मिळाले आहे. जोपर्यंत त्याच्याजवळ नागमणी आहे, तोपर्यंत त्याचा मृत्यु होणे शक्य नाही. विधात्याने प्रत्येक जीवासाठी वेगळे कायदे केले आहेत. प्रत्येक जीवाला स्वातंत्र्यपणे जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार परमेश्वराने सर्वांनाच प्रधान केला आहे. त्यामुळे आपण त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.’’
“म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला?” नागराजने विचारले.
“म्हणजेच हा नागमणी धारण केलेला दिव्य अर्धनागमनुष्य अगदी चंद्र, तारे अस्तित्वात असेपर्यंत जीवंत राहू शकतो आणि त्याच्याकडे असलेल्या अद्भूत शक्तींमुळे आपण त्याचे काहीही बिघडवू शकत नाही.’’ नागतपस्वींच्या बोलण्याने सगळे नाग स्तब्ध झाले. कोणीही काहीच बोलत नव्हते. तेवढ्यात.....
“मल्ल मुक्त कर त्याला.’’नागतपस्वी म्हणाले. तसे मल्लने प्रकाशच्या शरीराभोवतीचा विळखा काढला आणि त्याला मुक्त केले.
इतका वेळ ‘मल्ल’ नागाने प्रकाशचे शरीर आवळले होते. त्यामुळे त्याचा जीव गुदमरल्यासारखा झाला होता. मल्लने त्याच्या शरीराभोवतीचा विळखा काढल्यावर त्याला, आता कुठे नीट श्वास घेता येऊ लागला. तो जरी तलवारीच्या प्रहारापासून वाचला होता तरीही त्या भयावह आणि विचित्र वातावरणात तो फार काळ राहू शकला नसता. नागराजने त्याला सांगितलेल्या गोष्टींवर त्याचा सुरुवातीला विश्वास बसला नव्हता. तरी त्याला त्याच्या बोलण्यावरुन आपण पृथ्वीवर नसून नागलोकात असल्याचे कळले होते. पण त्याला हे ठिकाण कुठे आहे? याबद्दल काहीही माहिती नव्हती. त्याशिवाय तेथुन पृथ्वीवर स्वगृही कसे जाता येईल? हे सुद्धा त्याला माहित नसल्याने तो अस्वस्थ झाला होता. त्याला काहीही करुन, तिथुन बाहेर पडायचे होते. त्याचा जीव त्या जागेत घुसमटत होता.
“नागतपस्वी ह्या मनुष्याच्या मस्तकावर नागमणी असल्याचे तुम्हाला कसे काय माहित पडले? म्हणजे याच्या आधीसुद्धा तुम्ही याला भेटला आहात?’’ असे कित्येक प्रश्न नागराजने उपस्थित केले. त्यावर नागतपस्वींनी कसला तरी विचार केला आणि मग.... “आम्हाला दिव्यदृष्टी आहे, हे बहुतेक तु विसरला आहेस वाटते...नागराज.’’ असे बोलून त्यांनी तो विषय तेथेच संपवला.