अफलातून जाहिराती: आमचे शिमेंट
एक मोठ्ठा आफ्रिकन डायनोसॉर रागात येतो आणि भारतातल्या एका बिल्डिंगला तोडायला धावतो. हात, पाय आणि शेपटी जोरजोरात बिल्डिंगवर आदळतो. पण बिल्डिंग काही तुटत नाही. शेवटी त्याची शेपटीच तुटते आणि बिचारा तो नाराज होऊन परत जातो. सिमेंटने बनलेला "भांगुर" नावाचा ब्रिटिश माणूस बिल्डिंगवरच्या पोस्टरवर शांत हाताची घडी घालून उभा असतो. तो लाडात येऊन बोलतो, "भारतीयांनो, आमचे ब्रिटिश भांगुर सिमेंट घ्या. सोन्यापेक्षा महाग आहे पण डायनोसॉर कडून पण तुटत नाही. सास्ता नाई साबसे आच्चा! मला हिंदी पण नीट बोलता येत नाही पण तरीही टूम हमारा शिमेन्ट लो!"