Get it on Google Play
Download on the App Store

कॉमेडी: सरपटणारे विनोद

न्यूज चॅनेल्सवर खाली सरपटणाऱ्या बातम्या काही चॅनेल्स वर एका ऐवजी दोन पट्ट्यांमध्ये असतात.

त्यामुळे दोन वेगवेगळ्या बातम्या आपल्याला एकच वाटतात किंवा जर त्या 'एकच बातमी' असल्यासारख्या वाचल्यात तर त्यातून तयार होते हास्यास्पद विसंगती!

अशाच काही विसंगती मी तयार केल्या आहेत व आपणासाठी देत आहे.

त्याचे नामकरण मी " सरपटणारे विनोद " असे केले आहे.

आवडल्यास व हसू आल्यास तसे जरुर कळवा.....

•सबका मालिक एक - महाराष्ट्र सरकारची घोषणा!
•राज्यात पावसाची दमदार हजेरी - मेधा पाटकर यांचा आरोप
•तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड - मदतीसाठी संपर्क साधा ४५६७८९ या क्रमांकावर!
•मुंबईत मुसळधार पाउस - इराक सापडले अडचणीत !
•रस्त्यावर दुभाजक लक्षात न आल्याने - कृत्रिम पावसाची गरज
•हवामानात होणारे बदल - ही या कॉलेजची वैभवशाली परंपरा
•मायकल जॅक्सन जीवंत आहे - मायकल जॅक्सनला लाखो चाहत्यांनी दिला अखेरचा निरोप.
•एशा कोप्पिकर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने खुश - बच्चन यांना पोटदुखी.
•अनिल कपूर ला पस्तीस लाखाचा दंड- जागतीक मंदी चा परीणाम!
------------------------------------------------------
( भाग दोन मध्ये थोडा बदल. म्हणजे टि. व्ही. वर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा, किंवा जाहिरातीचा संबध, खाली सरपटणाऱ्या बातम्यांशी लावला तर काय धमाल येईल...)

•ग्रामीण भागात दोन मामे बहिणी विवाह करणार - अब्बास टायरवाला ची तीन तास कसून चौकशी.
•आज राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता - उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य!
•अमेरिका इराक युद्ध भडकले - इंग्लंड चार धावांनी पराभूत. तेंडुलकर सामनावीर!
•"काय? तु काल रात्री कसलीच खबरदारी घेतली नाही? " - डेंगूची साथ. योग्य ती खवरदारी घ्या!
•शेअर बाजाराची उसळी! - "अशा प्रकारच्या उसळींचा आपण आहारात नेहेमी सामावेश करावा! "
•राज्यभर दुष्काळी परिस्थिती - "मला माझ्या मुलीला वाचवायला हवं. मी साबणाचं नाव सांगायला विसरले! "
•-च्या निधनाने एक उमदा खेळाडू हरपला - " उंची सहा फुट, रंग गोरा - सापडल्यास या क्रमांकाअर संपर्क साधा! "
•इंग्लंडमध्ये मॅडम टुसाडस मध्ये शहारुखचा पुतळा बसवला - सलमान घोड्यावरून पडला.




आजकाल सगळ्या हिंदी मराठी न्यूज चॅनेल्सवर तळाशी ब्रेकींग न्यूज देतात. पण त्या जर सरकणाऱ्या (स्क्रॉलींग) नसल्यात तर आणि बातमीचे वाक्य खुप मोठे असेल तर त्या बातमीच्या वाक्याची कशी फोड ( की तोड फोड? ) केली जाते व त्यातून कसे विनोदी वाक्ये तयार होतात ते आपण बघूया. त्या फोडीतील पहिले वाक्य वाचल्यावर पूर्ण बातमीचा अंदाज येत नाही. कधी कधी असे वाटायला लागते की जागा उपलब्ध असतांनाही मुद्दाम उत्सुकता ताणण्यासाठी व प्रेक्षक जास्त काळ टिकून राहाण्यासाठी सुद्धा ही फोड केली जात असावी.

उदाहरणार्थ :

दिल्लीत भेट
सोनियांशी भेट
राणे दिल्लीत
पंधरा मिनिटे चर्चा
राणे सोनियांना भेटले
सोनियांशी चर्चा
दिल्लीत चर्चा
तपशील गोपनीय
सोनियांशी चर्चेचा तपशील गोपनीय
राणेंची चर्चा ...
हुश्श्श्श !!! संपली एकदाची बातमी!

खालील प्रकार मी तयार केलेत :

(1)
अटक
ड्रायव्हरला अटक
नाशिकजवळ मृत्यू
मुलाचा मृत्यू
पाच वर्षे वयाचा मुलगा
मुलगा पहिलीत
पोलीस आले
ट्रकने मुलाला दिली होती टक्कर
जमावाची तोड फोड
नाशिकजवळ अपघात

(2)

कपडे झाले ओले
अभिनेत्री चे कपडे
सर्दीवर आता उपाय काय?
डायरेक्टरची चिंता
तपासणी
पाण्याची तपासणी
अभिनेत्रीवर टाकलेल्या पाण्याची वैद्यकीय तपासणी
आई आली
सेटवर हंगामा
सेटवर अभिनेत्रीची आई आली
तीने केला हंगामा
थोबाडीत दिली
डायरेक्टरचा गाल सुजला
आईची धमाल
सेटवर अभिनेत्रीच्या आईची धमाल
सर्दीबाबत जाब विचारले

(3)

सावधान! हत्तीची रात्र आहे.
आज येणार हत्ती
तुम्ही हादराल
हत्ती येईल तुमच्या टि. ही. मध्ये
एक हत्ती रात्री ११ वाजता तुमच्या घरात येईल (टि. व्ही. समोर बसलेले सगळे पाचई पास प्रेक्षक आहेत वाटते)
आज तुमच्या टि. व्ही. मधून बाहेर येईल एक हत्ती
तो आधी एक सोंड बाहेर काढील
मग तुमच्या टि. व्ही. चा आवाज वाढवील
आणि टि. व्ही. बंद करून टाकील
तुम्ही मग आमचा कार्यक्रम पाहू शकणार नाही
आहे ना गंम्मत?
विसरू नका... रात्री अकरा वाजता... टि. व्ही. ऑन करा

(4)

आज रात्री अकरा वाजता ऐकू येणार एक आरोळी
एक तेज आरोळी
तुमच्या कानठळ्या बसतील.
पण घाबरू नका
टि. व्ही. बंद पण करू नका
एक अशी व्यक्ती आमच्या स्टुडीओ मध्ये यणार..
की तुमचे डोळे विस्फारणार
विस्फारून विस्फारून पेंगणार
पण झोपू नका
जागे राहा
बरोब्बर अकरा वाजता
स्टुडीओत येणार एक सिंह
डरकाळी फोडणार
आमच्या खास प्रतिनिधीने पकडून आणलेला सिंह
सिंहाशी बोलायचे असल्यास आम्हाला फोन करा
बघायला विसरू नका : सिंह इज किंग ( ऑफ द जंगल! )

(5)

रात्री जाग्या झाल्या
प्रियकर सापडला
रेल्वे इंजीन्सची टक्कर
हरवला होता
रात्री आल्या आठवणी
प्रियकराच्या आठवणी जाग्या झाल्या
शहर हादरले
प्रियकर सापडला प्रेयसीला - विषेश कार्यक्रम पाहा रात्री दहा वाजता
आरोपीला कोठडी
शहर बॉंबस्फोटांनी हादरले
पोलीस आले
समोरासमोर दोन रेल्वे इंजीन्सची टक्कर झाली
घटस्फोट झाला
याला गार्डच जबाबदार
अभिनेत्रीचा आक्रोश
खेळाडूशी घटस्फोट
महाराष्ट्रात पाऊस नाही
त्यामुळे आता तुम्ही मोबाईलवरच बील भरू शकता
भारतात गरिबी वाढली
कोटींना विकले गेले खासदार
म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या!
महागाईने जनता त्रस्त
धनाढ्यांच्या धुंद पार्ट्या - विषेश कार्यक्रम
कित्येक ठिकाणी दुष्काळसुदृष्य परिस्थिती
स्विमींग पूलच्या उद्घाटनाला आली अभिनेत्री - "म्यांवलीका मांजरावत"
सगळ्यांसमोर पोहून करणार उद्घाटन
झोपडपट्टीत राहाणाऱ्यांना अंगावर कपडा नाही ..............

वाचनस्तु

Nimish Navneet Sonar
Chapters
""पुस्तके कशाला वाचायची?"" ""माझा वाचक मित्र आणि मी"" "@दिवाळी अंक लेख २०१६: आम्ही सोशल सोशल!" "# Similar Words Different Meanings" "# महासुविचारांचा महासंग्रह" "# शब्द शुद्धी" "कविता संग्रह" (निसर्ग) "कविता संग्रह" (प्रेम) "कविता संग्रह" (राजकारण) "कविता संग्रह" (विडंबन) "कोडे संग्रह" "ग्राफिटी" "चारोळी संग्रह" "धम्मक लाडू" "नाही" चा महिमा! "हलके फुलके" [शतशब्दकथा स्पर्धा] "सृजनचौर्य" @बॉलीवूड बाईट्स <जगावं तरी कसं?> 4 महत्वाचे प्राणायाम अनुभव: त्यानंतर असे झाले असेल तर अनुभव: फसवणुकीच्या "आयडीयांपासून" सावधान! अनुभव: सावधान!!! पुढे "माहितीचा धोका" आहे!! कथा: अपूर्ण स्वप्न कथा: असा डाव उलटला कथा: आघात कथा: जलजीवा कथा: बाबाजार कथा: रशियन एजंट ज्याने जगाला वाचवले कथा: विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य कथा: शापित श्वास कथा: शिकारी साखळी कथा: सवाशेर तडका कथा: हेल्मेट कॉमेडी: 'कोलावरी डी' चे विडंबन कॉमेडी: 'सांगू काय' गाण्याचे विडंबन कॉमेडी: अजब महिलांदोलन कॉमेडी: अफलातून जाहीराती कॉमेडी: आनंद आणि अंत कॉमेडी: कौन बनेगा हास्यपती कॉमेडी: क्रांतीकारी कुटुंब कॉमेडी: गोलू गलबले कॉमेडी: चित्रमानपत्र कॉमेडी: दबंग बाम कॉमेडी: धृतराष्ट्र का लैपटॉप कॉमेडी: नको तेव्हा नको तिथे नको तेच... कॉमेडी: पुणेरी बसमधील सूचना कॉमेडी: फिल्मी नावांची गम्मत कॉमेडी: मार्जारी आगलावे कॉमेडी: मुद्राराक्षसाचे विनोद (पूर्ण संग्रह) कॉमेडी: मेमरी लॉस कॉमेडी: रजनीकांतचे सुपरहीट कारनामे कॉमेडी: सरपटणारे विनोद कॉमेडी: स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई कॉमेडी:अशीही प्रस्तावना गूढकथा - आग्या वेताळ चित्रपट परीक्षणः २०१२ (एक मायावी सत्यानुभव) चित्रपट परीक्षणः क्रिश ३ चित्रपट परीक्षणः रजनीकांतचा रोबोट चित्रपट परीक्षण: अवतार चित्रपट परीक्षण: मी शिवाजीराजे भोसले बोलतोय! चित्रपट परीक्षण: हनुमान रिटर्न्स- अदभुत कल्पनाशक्ती छोटा पडदा टीव्ही: ई टिव्ही मराठी वरची मालिका: श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी टीव्ही: मालिका- चक्रवर्तीन अशोक सम्राट! टीव्ही: स्टार प्लस - साईबाबा : अत्युत्कृष्ट मालिका टीव्ही: स्टार प्लसवरचे महाभारत नटसम्राट: एक ओझरता दृष्टीक्षेप! निमिष मूव्ही ट्वीस्ट (जरा गम्मत) पुस्तक परीक्षण: संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली भटकयात्रा: ठेंगोडे चे जागृत सिद्धिविनायक मंदिर भटकयात्रा: प्रवासवर्णन पुस्तके लेख: "अशा" चित्रपटांची "ऐशी-तैशी" लेख: "गैर"समज! लेख: "गॉड पार्टीकल्स​" बिग बॅन्ग थेअरी? लेख: अक्सर जिंदा गद्दार डार्लिंग मर्डर लेख: अध्यात्म आणि विज्ञान: तुलना योग्य की अयोग्य? लेख: अनियंत्रित लोकसंख्यावाढ आणि भ्रष्टाचार लेख: उलटे समीकरण घातक! लेख: कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी! लेख: चर्चा नको? वाद हवा?? लेख: चित्रपटांची कैची लेख: चित्रपटातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य लेख: जीवनाची गाडी! लेख: झोपलेले बर्फ लेख: तर्कहीन सात गोष्टी आणि त्यांचे एकच वैज्ञानिक स्पष्टीकरण? लेख: तुलनेचा तराजू लेख: दांभिक लोक कसे ओळखावेत? लेख: नात्यातले लहान मोठे लेख: निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा || लेख: निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!! लेख: नेहेमीची वाट लेख: पाश्चात्य संस्कृती- भौगोलिक की प्रतीकात्मक? लेख: पैसोबा पुराण लेख: पोस्टर वरचे उजवे डावे लेख: प्रत्येक नात्याचा पाया- संवाद आणि सुसंवाद! लेख: प्रेरणादायी प्रकाश लेख: बसमध्ये डावीकडील स्त्रीयांची राखीव जागा लेख: भाकरीचा चंद्र लेख: भारत का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश? लेख: भारतीय पादचारी बनणार क्रिश लेख: भारतीय संस्कृतीची विरोधाभासी शिकवण लेख: मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता लेख: महाभारताचे जीवन सार लेख: मानवी स्पंज आणि स्प्रिंग! लेख: मुलगा मुलगी हक्क कर्तव्य लेख: मुलींचे स्कार्फ आणि विरोधाभास!!! लेख: यशाची ९ सूत्रे लेख: यशाची प्रभावी दशसूत्री!! लेख: यशाचे सूत्र- वॉच गॉड लेख: रिंगटोन्सच्या राज्यात लेख: विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य लेख: विश्वातील पहिला सजीव आणि निर्जीव कोण? लेख: श्वानत्रस्त विरुद्ध श्वानप्रेमी लेख: संकटकाळी प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांचे काम? लेख: सकारात्मक दृष्टीकोन लेख: सकारात्मक भाषा लेख: समान "वाटा" हवा? लेख: सर्व मराठी वर्तमानपत्रे उभ्या आकाराची असावीत का? लेख: सर्वेक्षण आणि ज्योतिष लेख: सासू ही आई का होवू शकत नाही? लेख: सासू-सून-नणंद-जावा-भावजयी लेख: स्त्री-पुरुष समानता आणि कायद्यातील विषमता लेख: स्पष्टवक्ता की भ्रष्टवक्ता ? लेख: हीएइ ह्योए ह्याई हीयेहे सोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका शाहरुखचा "राईस" सोनी टीव्हीवरील पेशवा बाजीराव मालिकेबद्दल live चर्चा डोंबिवली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अफलातून जाहिराती: आमचे शिमेंट सर, मी बँकेतून बोलतेय! कॉपी कॅट बिस्किट्स राजा राणी गुलाम ब्रेकिंग न्यूज: "जलजीवा" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद: काही विचार (#Nimishtics) सद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा! वर्तमानपत्र की जाहिरातपत्र? अमिताभ - तेव्हा आणि आता चारोळ्यांचे चांदणे टीका आणि प्रशंसा - एक आढावा! पुस्तक परीक्षण: "माझं काय चुकलं?" मराठी बोला चळवळ बॉलीवूड बाईट्स कलर गीतानो - संगीत प्रेमींनी हे जरूर वाचा!