Android app on Google Play

 

चित्रपट परीक्षणः रजनीकांतचा रोबोट

 

गेल्या शुक्रवारी १ ऑक्टोबरला रजनीकांतचा "रोबोट" चित्रपट प्रदर्शीत झाला.
सुरुवातीपासूनच उत्सुकता होतीच.
रविवारी बघितला. मोठ्या पडद्यावर.
बघायला जाण्या आधी, भारतीय चित्रपट आणि तोही सायन्स फिक्शन अ‍ॅक्शन थ्रिलर म्ह्टल्यावर मन थोडे नाही म्हटले तरी साशंक होतेच, ते यासाठी की एवढा खर्च करून त्यात कल्पनादृष्टी नीट वापरली असेल की नाही?
कारण, हरमन बावेजाचा लव्ह स्टोरी खुप स्पेशल इफेक्टची रेलचेल असूनही पडला होता. अर्थात तो मी बघितला नव्हताच.
पण, रोबोटचा दक्षिणेकडचा "शंकर" हा निर्माता असल्याने व तो हिंदित डब असल्याने थोडे हायसे वाटत होते.
कारण त्याचे पूर्वीचे काही चित्रपट बर्‍यापैकी कल्पनाशक्ती वापरुन बनवले गेले होते. उदा. जीन्स, हिंदुस्तानी वगैरे.
तसा सायन्स्स फिक्शन क्रीश हीट झाला होताच. पण त्यात स्पेशल इफेक्ट्स हातचे राखून वापरले होते आणि त्याची कथा पाच पाच जणांनी लिहीली होती आणि बरीच मोठी आणि क्लीष्ट होती.
रोबोटचा लेखक एकच आहे. शंकर.
कथा सोपी आहे. जास्त क्लिष्ट नाही.
आणि कल्पनाशक्ती म्हणाल तर अद्भुत, अद्वितीय.
दक्षिणेत तर रजनिकांतच्या फॅन्स नी सकाळी दोन वाजल्यापासून सकाळी चार च्या शो साठी रांगा लावल्या होत्या अशी बातमी टाईम्स ला होती. आणि एकेक तिकिट ५००० रु ना काळ्या बाजारात विकले गेले होते, असे वाचनात आले.
खरोखरच चित्रपट बघण्यासारखा आहे, यात वादच नाही.

कथा :


डॉ. वशी याने एक रोबोट (नाव: चिट्टी) बनवला असतो जो त्याला (त्याच्या सारखे अनेक रोबोट बनवून) सैन्यात शत्रूविरुद्ध वापरायचा असतो. त्याचा प्रतिस्पर्धी आणि गुरु डॉ. व्होरा याला तसाच रोबोट बनवता येत नाही. तो चिट्टीकडून त्याची न्युरोटीक संरचना चोरण्याच्या बेतात अस्तो. त्याला तसाच रोबोट बनवून आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना घातक कामासाठी त्याला विकायचा असतो. पण तो बनवता येत नसल्याने डॉ. वशी च्या रोबोट्ला तो विविध कारणांनी सैन्यात घेण्यासाठी नाकारतो.
काही चुका रोबोटकडून ही अशा घडतात (आगीतला "तो" प्रसंग) की व्होराच्या म्हणण्याला पुष्टी मिळते. मग तो वशीला रोबोट मध्ये भावना निर्माण होईल असे करायला भाग पाडतो, म्हणजे रोबोट स्वतः काही निर्णय घेवू शकेल.
रोबोटमध्ये भावना येतात आणि अघटीत घडते. रोबोट मध्ये वशीच्या मैत्रीणिवद्दल (ऐश्वर्या) प्रेमभावना निर्माण होते आणि त्यासाठी तो वशीच्या विरोधात जातो.
मॅन. मशीन. मोहब्बत.
वशी त्याला तोडून टाकतो. डिसमॅण्टल करतो. पण तोडलेला रोबोट पुन्हा बनवून व्होरा त्यात विध्वंसक चीप बसवतो.....
पुढे काय?
चित्रपट जावून पहाच.

स्पेशल ईफेक्ट्स बद्दल :
- चित्रपटात स्पेशल ईफेक्ट्स ची अगदी सुरुवातीच्या दृश्यापासून इतकी रेलेचेल आहे की काय सांगावे.
- सगळे इफे़क्ट्स जागतीक दर्जाचे आहेत. त्यासाठी चित्रपट कोठेच कमी पडत नाही.
- क्लायमॅक्सचा सीन तर या सगळ्यांवर कडी आहे. कळस आहे. त्यातली कल्पनाशक्ती आणि इफे़क्ट्स आजपर्यंत कोणत्याच चित्रपटात आपण यापूर्वी बघितले नाहियेत. अगदी हॉलीवूडच्या चित्रपतात सुद्धा नाही. बरं!
एकदम ओरिजीनल आणि क्लास....झकास.

अ‍ॅक्शन दृश्ये :
- अद्वितिय, अप्रतिम.
- रेल्वेचा मारामारीचा आणि पाठलागाचा सीन ग्रेट (महान)
- रोबोट स्वरूपातला रजनीकांत (चिट्टी) ऐश्वर्याला लग्नाच्या मंडपातून पळवून नेत असतांना रस्त्यावरची अ‍ॅक्शन दृश्ये लाजवाब, थरारक.
- चित्रटातली इतर सगळी अ‍ॅक्शन दृश्ये थरारक.

इतर वैशिष्ट्ये:
- सैन्यात घेण्या आधी एका मिटींग मध्ये डॉ. व्होरा रोबोटला "सैन्यात वापरण्यास अयोग्य" आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्या पद्धतीने काही सूचना रोबोटला देतो, त्यातले स्पेशल इफेक्ट आणी कल्पना अगदी खासच.
- इलेक्ट्रो मॅग्नेटिक मोड मध्ये गुंडाची सगळी शस्त्रे ओढली जातात आणि तो अवतार काली सारखा दिसतो, आणि अडानी स्त्रीया लगेच अंगात येवून घुमायला लागतात. विनोद निर्मीती, अ‍ॅक्शन, स्पेशल इफेक्ट, अंधश्रद्धेचा पगडा .. सगळे कल्पकतेने एकाच दृश्यात दाखवले. वा!
- मच्छरा सोबतचा रोबोतचा संवाद. छान आणि ओरिजीनल विनोद.

अभिनय :
- रजनिकांतने डॉ. वशी आणि पहीला रोबोट, तसेच दुसरा व्होराचा रोबोट दोघांची ही भूमीका उत्तम साकारली आहे.
- रोबोटने अभिनय छान केला आहे.
- काही दृश्य मनाला चटका लावून जातात.
गाणी:
- गाणी मात्र खास लोकप्रिय आणि श्रवणीय नाहीत.
- मात्र गाणी प्रेक्षणीय आहेत.
(हिंदुस्तानी मधील "माया मच्छींद्र "गाणे आठवतेय?)

हा चित्रपट ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जरूर बघावा. दुप्पट पैसे वसूल.
ज्यांनी बघीतला त्यांनी आपले मत व्यक्त करावे
 

वाचनस्तु

Nimish Navneet Sonar
Chapters
""पुस्तके कशाला वाचायची?""
""माझा वाचक मित्र आणि मी""
"@दिवाळी अंक लेख २०१६: आम्ही सोशल सोशल!"
"# Similar Words Different Meanings"
"# महासुविचारांचा महासंग्रह"
"# शब्द शुद्धी"
"कविता संग्रह" (निसर्ग)
"कविता संग्रह" (प्रेम)
"कविता संग्रह" (राजकारण)
"कविता संग्रह" (विडंबन)
"कोडे संग्रह"
"ग्राफिटी"
"चारोळी संग्रह"
"धम्मक लाडू"
"नाही" चा महिमा!
"हलके फुलके"
[शतशब्दकथा स्पर्धा] "सृजनचौर्य"
@बॉलीवूड बाईट्स
<जगावं तरी कसं?>
4 महत्वाचे प्राणायाम
अनुभव: त्यानंतर असे झाले असेल तर
अनुभव: फसवणुकीच्या "आयडीयांपासून" सावधान!
अनुभव: सावधान!!! पुढे "माहितीचा धोका" आहे!!
कथा: अपूर्ण स्वप्न
कथा: असा डाव उलटला
कथा: आघात
कथा: जलजीवा
कथा: बाबाजार
कथा: रशियन एजंट ज्याने जगाला वाचवले
कथा: विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य
कथा: शापित श्वास
कथा: शिकारी साखळी
कथा: सवाशेर तडका
कथा: हेल्मेट
कॉमेडी: 'कोलावरी डी' चे विडंबन
कॉमेडी: 'सांगू काय' गाण्याचे विडंबन
कॉमेडी: अजब महिलांदोलन
कॉमेडी: अफलातून जाहीराती
कॉमेडी: आनंद आणि अंत
कॉमेडी: कौन बनेगा हास्यपती
कॉमेडी: क्रांतीकारी कुटुंब
कॉमेडी: गोलू गलबले
कॉमेडी: चित्रमानपत्र
कॉमेडी: दबंग बाम
कॉमेडी: धृतराष्ट्र का लैपटॉप
कॉमेडी: नको तेव्हा नको तिथे नको तेच...
कॉमेडी: पुणेरी बसमधील सूचना
कॉमेडी: फिल्मी नावांची गम्मत
कॉमेडी: मार्जारी आगलावे
कॉमेडी: मुद्राराक्षसाचे विनोद (पूर्ण संग्रह)
कॉमेडी: मेमरी लॉस
कॉमेडी: रजनीकांतचे सुपरहीट कारनामे
कॉमेडी: सरपटणारे विनोद
कॉमेडी: स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई
कॉमेडी:अशीही प्रस्तावना
गूढकथा - आग्या वेताळ
चित्रपट परीक्षणः २०१२ (एक मायावी सत्यानुभव)
चित्रपट परीक्षणः क्रिश ३
चित्रपट परीक्षणः रजनीकांतचा रोबोट
चित्रपट परीक्षण: अवतार
चित्रपट परीक्षण: मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!
चित्रपट परीक्षण: हनुमान रिटर्न्स- अदभुत कल्पनाशक्ती
छोटा पडदा
टीव्ही: ई टिव्ही मराठी वरची मालिका: श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी
टीव्ही: मालिका- चक्रवर्तीन अशोक सम्राट!
टीव्ही: स्टार प्लस - साईबाबा : अत्युत्कृष्ट मालिका
टीव्ही: स्टार प्लसवरचे महाभारत
नटसम्राट: एक ओझरता दृष्टीक्षेप!
निमिष मूव्ही ट्वीस्ट (जरा गम्मत)
पुस्तक परीक्षण: संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली
भटकयात्रा: ठेंगोडे चे जागृत सिद्धिविनायक मंदिर
भटकयात्रा: प्रवासवर्णन पुस्तके
लेख: "अशा" चित्रपटांची "ऐशी-तैशी"
लेख: "गैर"समज!
लेख: "गॉड पार्टीकल्स​" बिग बॅन्ग थेअरी?
लेख: अक्सर जिंदा गद्दार डार्लिंग मर्डर
लेख: अध्यात्म आणि विज्ञान: तुलना योग्य की अयोग्य?
लेख: अनियंत्रित लोकसंख्यावाढ आणि भ्रष्टाचार
लेख: उलटे समीकरण घातक!
लेख: कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!
लेख: चर्चा नको? वाद हवा??
लेख: चित्रपटांची कैची
लेख: चित्रपटातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य
लेख: जीवनाची गाडी!
लेख: झोपलेले बर्फ
लेख: तर्कहीन सात गोष्टी आणि त्यांचे एकच वैज्ञानिक स्पष्टीकरण?
लेख: तुलनेचा तराजू
लेख: दांभिक लोक कसे ओळखावेत?
लेख: नात्यातले लहान मोठे
लेख: निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||
लेख: निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!
लेख: नेहेमीची वाट
लेख: पाश्चात्य संस्कृती- भौगोलिक की प्रतीकात्मक?
लेख: पैसोबा पुराण
लेख: पोस्टर वरचे उजवे डावे
लेख: प्रत्येक नात्याचा पाया- संवाद आणि सुसंवाद!
लेख: प्रेरणादायी प्रकाश
लेख: बसमध्ये डावीकडील स्त्रीयांची राखीव जागा
लेख: भाकरीचा चंद्र
लेख: भारत का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश?
लेख: भारतीय पादचारी बनणार क्रिश
लेख: भारतीय संस्कृतीची विरोधाभासी शिकवण
लेख: मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता
लेख: महाभारताचे जीवन सार
लेख: मानवी स्पंज आणि स्प्रिंग!
लेख: मुलगा मुलगी हक्क कर्तव्य
लेख: मुलींचे स्कार्फ आणि विरोधाभास!!!
लेख: यशाची ९ सूत्रे
लेख: यशाची प्रभावी दशसूत्री!!
लेख: यशाचे सूत्र- वॉच गॉड
लेख: रिंगटोन्सच्या राज्यात
लेख: विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य
लेख: विश्वातील पहिला सजीव आणि निर्जीव कोण?
लेख: श्वानत्रस्त विरुद्ध श्वानप्रेमी
लेख: संकटकाळी प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांचे काम?
लेख: सकारात्मक दृष्टीकोन
लेख: सकारात्मक भाषा
लेख: समान "वाटा" हवा?
लेख: सर्व मराठी वर्तमानपत्रे उभ्या आकाराची असावीत का?
लेख: सर्वेक्षण आणि ज्योतिष
लेख: सासू ही आई का होवू शकत नाही?
लेख: सासू-सून-नणंद-जावा-भावजयी
लेख: स्त्री-पुरुष समानता आणि कायद्यातील विषमता
लेख: स्पष्टवक्ता की भ्रष्टवक्ता ?
लेख: हीएइ ह्योए ह्याई हीयेहे
सोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका
शाहरुखचा "राईस"
सोनी टीव्हीवरील पेशवा बाजीराव मालिकेबद्दल live चर्चा
डोंबिवली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
अफलातून जाहिराती: आमचे शिमेंट
सर, मी बँकेतून बोलतेय!
कॉपी कॅट बिस्किट्स
राजा राणी गुलाम
ब्रेकिंग न्यूज: "जलजीवा" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद:
काही विचार (#Nimishtics)
सद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा!
वर्तमानपत्र की जाहिरातपत्र?
अमिताभ - तेव्हा आणि आता
चारोळ्यांचे चांदणे
टीका आणि प्रशंसा - एक आढावा!
पुस्तक परीक्षण: "माझं काय चुकलं?"
मराठी बोला चळवळ
बॉलीवूड बाईट्स
कलर गीतानो - संगीत प्रेमींनी हे जरूर वाचा!