ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्व...
ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर माउली । खेचरा वोळली कृपासिंधु ॥१॥
ज्ञानदेवा चरणी खेचर शरण । नामदेवा पूर्ण कृपा केली ॥२॥
नामदेवें हात चोखियाचे शिरी । विठ्ठल ती अक्षरी उपदेशिले ॥३॥
वंका म्हणे माझा चोखा गुरु माउली । तयाचे पाउलीं लोटांगण ॥४॥