येणे जाणें दोनी खुंटले मा...
येणे जाणें दोनी खुंटले मारग । अवघा केला त्याग इंद्रियांचा ॥१॥
एक धरिला मनीं पंढरीचा राणा । वेदशास्त्र पुराण अकळ तो ॥२॥
आगमनाची आटी निगमा नकळे । बहुत शीणले वाखाणितां ॥३॥
वंका म्हणे तो हा पहा विटेवरी । पाउलें गोजिंरी कर कटी ॥४॥