आपुलिया ब्रीदा आपण सांभाळ...
आपुलिया ब्रीदा आपण सांभाळी । तूंचि माझा बळी मायबाप ॥१॥
तुम्हांविण कोणा जाऊं मी शरण । कांहो अभिमान नये माझा ॥२॥
हीन याती दीन पतीत आगळा । म्हणोनि कळवळा नये माझा ॥३॥
वंका म्हणे अहो पंढरीनिवासा । तुजविण आशा दुजी नाहीं ॥४॥