पहा हो नवल गोरियाचे घरी ।...
पहा हो नवल गोरियाचे घरी । कुल्लाळ भीतरीं स्वयें झाला ॥१॥
त्रैलोकी गमन ते झाले गाढव । आपुलें वैभव परतें ठेवी ॥२॥
गोणी भरोनियां स्वयें आणी हरी । त्याचें साहित्य करी रखुमाई ॥३॥
वंका म्हणे ऐसी आवडी भक्ताची । बोलतां वेदांची वाचा मौन्य ॥४॥