उपाधीच्या भेणें आलोंसे शर...
उपाधीच्या भेणें आलोंसे शरण । कायावाचामने सहित देवा ॥१॥
तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं माझें गणगोत पंढरिराया ॥२॥
तुं माझी साउली तू माझी माउली । प्रेमाची माउली तूंचि माझी ॥३॥
वंका म्हणे तुज विकिला जीवप्राण । काया वाचा मन सत्य देवा ॥४॥