हीन याती पतीत दुर्बळ । पर...
हीन याती पतीत दुर्बळ । परि तुम्ही दयाळ दिनानाथ ॥१॥
अनाथा कैवारी त्रिभुवनी ठसा । नामाचा भरंवसा त्रिभुवनीं ॥२॥
नाम घेतां कोणी न दिसे वायां गेला । ऐसाची गमला भावबळे ॥३॥
वंका म्हणे सर्वज्ञा विठोबा दयाळा । पुरवावा लळा हाची माझा ॥४॥