एक एकादशी जरी हो पंढरीसी ...
एक एकादशी जरी हो पंढरीसी । सुकृताच्या राशी ब्रह्मा नेणे ॥१॥
चंद्रभागेतीरीं चतुर्भुजा नरनारीं । तेथें उभा हरि पंढरीराव ॥२॥
परतोनि मागुता ऐसा कईं होसी । जाउनी पंढरीसी पाहे डोळां ॥३॥
तुझे देह गेह ऐसे पैं न म्हण । साधीं हें निधान पांडुरंग ॥४॥
पुनरपि संसारा न येसी मागुता । आणिक सर्वथा ऐसा नाही ॥५॥
वंका म्हणे पहाल भजाल देहीं । तापत्रय गेलें सर्वही पांडुरंगीं ॥६॥