आपुल्या भक्तांचा धरोनी अभ...
आपुल्या भक्तांचा धरोनी अभिमान । सगुण निर्गुण रूप धरी ॥१॥
जयाची वासना तेची पुरवीत । उभा राहे तिष्ठत बळिचे द्वारी ॥२॥
विदुराचे घरी आवडी खाय कण्या । धांवतसे धांवण्या भाजी पाना ॥३॥
वंका म्हणे अंबऋषीकारणें । दहा जन्म घेणे गर्भवास ॥४॥