न पुसतां गेला बहिणीचीया घ...
न पुसतां गेला बहिणीचीया घरा । गांव मेहुणपुरा नांदतसे ॥१॥
नाम तें निर्मळा निर्मळेचे तीरी । वाचे निरंतरी नामघोष ॥२॥
चोखा तैसी बहिण बहिण तैसा चोखा । सदा नाम मुखा विठोबाचें ॥३॥
वंका म्हणे धन्य ज्याचा अमृतजन्म । निघे अस्थी नाम विठोबाचें ॥४॥