सुखाचा सागर चोखा हा निर्ध...
सुखाचा सागर चोखा हा निर्धार । काय मी पामर गुण वानूं ॥१॥
धन्य प्रेमपान्हा पाजुनियां मातें । केलें असे सरतें आपणामाजी ॥२॥
आनंदी आनंद दाविलासे डोळा । दिली जीवनकळा माझी मज ॥३॥
वंका म्हणे माझी प्रेमाची माउली । कृपेची साउली केली मज ॥४॥