*राजधानीत 3
‘हे येथे इतके विद्यार्थी आहेत. त्यांना मी एक प्रश्न विचारू ?’
‘विचारा.’
‘तुम्ही सारे मोठी नोकरी मिळावी म्हणूनच आला आहात का ?’
‘हो, हो !’ सारे म्हणाले.
‘मला नको नोकरी !’ एक आवाज आला.
‘कोण म्हणतो, नको नोकरी ?’ तिने विचारले.
‘हा शिरीष !’ सारे हसून म्हणाले.
‘तुम्हाला नको नोकरी ?’ तिने गंभीरपणे प्रश्न केला.
‘नको !’ तो म्हणाला.
‘का ?’
‘मला खेड्यातच राहू दे. तेथे आईबापांची सेवा करु दे.’
‘आईबापांना येथे आणा...’
‘परंतु नकोच नोकरी नकोच.’
हेमा निघून गेली. ते सारे तरुण विद्यार्थी शिरीषची थट्टा करु लागले.
‘शिरीष, थोर आहे राजा तुझे नशीब.’
‘राजाचा प्रधान होशील.’
‘प्रधानाचा जावई होशील.’