कर्णाची महानता
जेव्हा कर्ण युद्धभूमीवर जखमी अवस्थेत आपले शेवटचे श्वास घेत होता, त्याची शेवटची परीक्षा घेण्यासाठी कृष्ण ब्राम्हण रूप घेऊन त्याच्यापाशी गेला आणि त्याच्याकडे सोनं मागितलं. कर्ण म्हणाला की माझे दात सोन्याचे आहेत ते तुम्ही घ्या. कृष्ण म्हणाला की हा खूप दुष्टपणा होईल. तर कर्णाने एक दगड घेऊन स्वतः आपले दात तोडून ब्राम्हणाच्या हातात दिले. कृष्ण म्हणाला की याला तर रक्त लागलं आहे, मी हे घेऊ शकत नाही. तेव्हा कर्ण, ज्याला हलताही येत नव्हतं, तशा अवस्थेत त्याने आकाशात एक बाण सोडला ज्यामुळे पाऊस सुरु झाला आणि दात स्वच्छ करून त्याने ब्राम्हणाला दिले.
स्त्रोत -https://www.quora.com/What-are-some-lesser-known-stories-from-The-Mahabharata
http://hindutva.info/untold-stories-mahabharata/?utm_source=Facebook&utm_medium=Blog&utm_campaign=11%20Untold%20stories%20of%20Mahabharata