Android app on Google Play

 

कृष्ण आणि पांडव

 एकदा कृष्ण आणि पाचही पांडव एका शहरातून जात असताना त्यांना एका गाढवाचे शव दिसले. त्या शावातून प्रचंड दुर्गंधी येत होती आणि आजूबाजूने जाताना सर्वजण तिथून आपलं नाक बंद करून चटकन निघून गेले. फक्त कृष्ण तिथून गेला नाही. तो तिथे उभं राहून ते शव पाहून हसत होता. जेव्हा ते सर्व थोड्या अंतरावर एका सुरक्षित जागी पोचले तेव्हा अर्जुनाने कृष्णाला विचारलं, " वासुदेव, तुम्ही तो एवढा दुर्गंध सहन कसा केलात आणि तरीही तुमच्या चेहेऱ्यावर हास्य कसं होतं? " कृष्णाने मंद हसून उत्तर दिलं, " जेव्हा सर्व जण त्या दुर्गंधीवर ध्यान केंद्रित करत होते, मी केवळ त्या गाढवाच्या सुंदर पांढऱ्याशूभ्र दातांकडे पाहत होतो. जरी त्या गाढवाला मारून खूप काळ लोटला होता, तरी त्याचे दात पांढरे शूभ्र आणि चमकदार होते. या गोष्टीवर मला हसू येत होतं." अर्जुन या गोष्टीचा विचार करून हैराण झाला की कृष्णाने एवढ्या दुःखद स्थितीतही खुश होण्याचे कारण कसे शोधून काढले होते?