Get it on Google Play
Download on the App Store

ययाती

 

ययाती या चंद्रवंशी राजाला देवयानी (दैत्यगुरू शुक्राचार्य यांची कन्या) हिच्याशी विवाह करावा लागला. कारण ती त्याला एका तलावात पडलेली आढळली आणि तिला बाहेर काढताना चुकून ययातीने तिला स्पर्श केला होता. शास्त्रानुसार अशा परिस्थितीत तो लग्न करण्यासाठी बांधील होता. देवयानी तलावात पडली कारण तिची मैत्रीण शर्मिष्ठा (विश्पर्वा ची कन्या) हिने तिला धक्का दिला होता. शर्मिष्ठा आणि देवयानी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या, परंतु जेव्हा देवयानीने चुकून आपल्या मैत्रिणीचे शाही कपडे घातले तेव्हा तिच्यावर रागावून शर्मिष्ठाने तिला धक्का देऊन तलावात पाडले होते. ययातीने वाचवल्यानंतर देवयानीने आपल्या वडिलांकडे शर्मिष्ठेची तक्रार केली. शुक्राचार्यांनी याचा बदला घेण्याचा निश्चय केला आणि असुर राजासाठी तोपर्यंत कोणताही यज्ञ न करण्याचा निर्णय घेतला जोपर्यंत शर्मिष्ठा देवयानीची क्षमा मागत नाही. शुक्राचार्यांनी अशीही अट घातली की आयुष्यभर शर्मिष्ठा देवयानीच्या दासीप्रमाणे राहील. असुर राजा विश्पर्वाकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता, कारण यज्ञाशिवाय तो आपल्या सेनेला देवांपासून वाचवू शकला नसता, म्हणून त्याने या गोष्टी मान्य केल्या. शर्मिष्ठा कडेही कोणता दुसरा मार्ग नव्हता आणि ती देवयानीसोबत आपल्या नव्या घरी निघून गेली. राजा ययाती आणि शर्मिष्ठा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लपून विवाह केला. जेव्हा शर्मिष्ठेच्या पुत्राने त्याला पिता म्हणून संबोधले तेव्हा देवयानीला आपली फसवणूक लक्षात आली. ती शुक्राचार्यांकडे गेली ज्यांनी ययातीला वृद्ध आणि नपुंसक होण्याचा शाप दिला. परंतु या शापाने देवयानी गडबडून गेली, कारण एक वृद्ध आणि नपुंसक राजा तिच्या काय कामाचा? शापाचा अंमल रद्द करता येत नसल्याने शुक्राचार्यांनी तो अंमल कमी करण्याचा उपाय सांगितला की ययाती हा शाप आपल्या एका मुलाला देऊ शकेल. देवयानीला ययाती पासून झालेला पुत्र यदु स्वतःवर शाप घेण्यास तयार झाला नाही. त्या रागाने ययातीने त्याला शाप दिला की न यदु आणि न त्याचे कोणी वंशज कधी राजा बनतील. या शापाने दुःखी होऊन यदू आपल्या वडिलांचा महाल सोडून निघून गेला आणि मथुरा इथे जाऊन नागराज याच्या कन्येशी विवाह करून तिथे स्थयिक झाला. मथुरा जन तंत्राचे पालन करत असल्यामुळे तो कधीही राजा बनू शकला नसता परंतु राजाप्रमाणे राहू शकत होता. पुढे यदू हा यादुवन्शियांचा कुलपती बनला. ययाती नंतर शर्मिष्ठेचा आणि आपला पुत्र पुरू कडे गेला आणि त्याला आपल्या शापाचा अंमल घेण्यासाठी सांगितले. पुरूने ते मान्य केले आणि ययाती आपले आयुष्य पुन्हा जगू लागला. पुढे ययातीला असं जाणवलं की केवळ तरुण असल्याने आयुष्यात फार काही आनंद मिळत नाही म्हणून त्याने पुरू कडून आपला शाप परत घेतला. पुरूला आपल्या पित्याची आज्ञा पाळल्यामुळे सिंहासनाचा उत्तराधिकारी घोषित करण्यात आलं. पुरू कुरु दळ, ज्यापासून कौरव आणि पांडवांचा जन्म झाला, त्या कुळाचा कुलपती झाला.