Android app on Google Play

 

बाबृवाहनाची गोष्ट

 


बब्रुवाहन म्हणजे अर्जुनाला मणिपूरची राजकुमारी चित्रांगदा हिच्या पासून झालेला पुत्र होता. बाबृवाहनाला त्याच्या आजोबांनी म्हणजेच चित्रांगदेच्या वडिलांनी आपला मुलगा म्हणून दत्तक घेतलं होतं. तो आपल्या महालात धन - दौलतीसह राज्य करीत होता. नंतर जेव्हा त्याला हे समजलं की अर्जुनच त्याचे वडील आहेत आणि तो अर्जुनाला भेटला तेव्हा तो आपल्या वडिलांना ओळखू शकला नाही.  जेव्हा अर्जुन मणिपुरात अश्वमेधाचा घोडा घेऊन पोचला तेव्हा बब्रुवाहन आणि अर्जुन यांच्यात युद्ध झालं  आणि त्या युद्धात बब्रुवाहन ने अर्जुनावार बाणाचा हल्ला करून त्याला मारून टाकले. या आपल्या अपराधाच्या पश्चात्तापाने हैराण होऊन तो स्वतःचा जीव घेणारच होता, की तेवढ्यात आपली सावत्र आई उलूपी हिच्याकडून त्याला एक हीरा मिळाला ज्याचा वापर करून त्याने आपल्या वडिलांना पुन्हा जिवंत केले. पुढे तो आपल्या वडिलांबरोबर हस्तिनापुरात परत आला. हा त्या शापाचा परिणाम होता जो वासुंनी अर्जुनाला महाभारतात भीष्मांचा वध करण्यासाठी दिला होता.