बार्बारिक आणि कृष्ण
बार्बारिक हा भीमाचा महाशक्तीवान असा नातू आणि कृष्णाचा शिष्य होता. बर्बारीकाला युद्धामध्ये पराभूत करणं हि अशक्य गोष्ट होती आणि त्याला कामख्या देवीनं तीन शर म्हणजेच बाण दिले होते. एका बाणानेच केवळ बार्बारिक दृष्टीपथात येणाऱ्या सर्व शत्रूंना मारून टाकू शकत होता, परंतु त्याने अशी शपथ घेतली होती की युद्धात तो कमकुवत किंवा कमी शक्तिशाली दलाची साथ देईल. ही गोष्ट म्हणजे पांडवांसाठी एक मोठा धोका होता, कारण युद्धाच्या पहिल्या दिवशीच बर्बारीकाने कौरवांच्या सेनेचा एक मोठा हिस्सा संपवून टाकला असता आणि कौरवांची बाजू कमकुवत झाली असती, आणि मग नाईलाजाने बर्बारीकाला कौरवांची साथ द्यावी लागली असती. म्हणूनच कृष्णाने त्याच्याकडून गुरुदक्षिणा म्हणून त्याचे शीर मागितले. शिष्य या नात्याने बर्बारीकाला त्याची ही गोष्ट मान्य करवी लागली.