Get it on Google Play
Download on the App Store

युद्धातील जेवण


कुरुक्षेत्राच्या युद्धा दरम्यान कौरव आणि पांडव दोघांचंही जेवण एकाच ठिकाणी, एकच आचारी बनवत असे आणि सर्व जण एकत्रच जेवत असत. युद्धाच्या सुरुवातीचे काही दिवस युधिष्ठिराला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की सर्वांसाठी पुरेसं जेवण असतं, पण कधीही थोडं देखील जेवण फुकट जात नाही. कारण त्या वेळी युद्ध चालू असताना आचाऱ्याला हे कसं समजतं की दिवस अखेर किती जणांचं जेवण बनवायचं आहे.
त्याने त्यांना विचारलं की जेवणाची मात्रा ते कशी काय निश्चित करतात? त्यांनी सांगितलं की रोज सकाळी मी कृष्णाला भेटायला जातो आणि विचारतो की किती लोकांसाठी जेवण बनवायचं आहे. ते मला संख्या आणि प्रमाण सांगतात, मी त्याप्रमाणे जेवण बनवतो. युधिष्ठिराला हे ऐकून आश्चर्य वाटले आणि हे देखील लक्षात आले की कृष्णाला सर्वांचे भविष्य माहिती असते.