Android app on Google Play

 

सहदेव

 आपल्या मृत्यू शय्येवर असताना पंडूने अशी इच्छा जाहीर केली की त्यांच्या मुलांनी त्यांच्या मेंदूचे सेवन करावे जेणे करून त्यांना अनुभव, बुद्धी आणि ज्ञान मिळू शकेल. केवळ सहदेवाने त्यांची हि गोष्ट मान्य केली आणि तो विश्वातील सर्वश्रेष्ठ ज्योतिषी बनला. खरी गमतीची गोष्ट ही आहे की त्याला माहिती होतं की युद्ध होणार आहे, परंतु ही गोष्ट जाहीर करण्या ऐवजी त्याने मौन पाळणे जास्त उचित मानलं.
सहदेव, ज्याने आपल्या पित्याच्या मेंदूचं सेवन केलं होतं, तो केवळ भविष्यच बघू शकत होता असं नव्हे तर तो एक अत्यंत कुशल असा ज्योतिषी देखील होता. म्हणूनच शकुनीने दुर्योधनाला सहदेव कडून युद्धासाठी योग्य असा मुहूर्त काढून आणायला सांगिते होते. आणि विशेष म्हणजे ही गोष्ट पांडवांसाठी उचित नाही हे माहित असूनही सहदेवाने मुहूर्ताची माहिती दुर्योधनाला दिली!