Get it on Google Play
Download on the App Store

यादवांचा मृत्यू



महाभारताच्या युद्धानंतर यादव अतिशय मुजोर झाले होते. ते दारू पिऊ लागले, जुगार खेळू लागले आणि अनेक बेकायदेशीर कामे करू लागले. एका दिवशी त्यांनी एका ऋषिची थट्टा करण्याचे योजिले. त्यांनी एका मुलाला एखाद्या स्त्री प्रमाणे नटवले आणि त्याच्या पोटावर कढई बांधून त्यावरून त्याला साडी नेसवली. त्यांनी त्याला त्या ऋषिन्च्या समोर नेले आणि विचारले की या स्त्री च्या पोटात जे मूल आहे तो मुलगा आहे की मुलगी? त्यावर त्या ऋषि नी आपला संयम न सोडता सांगितलं, " ते जे काही आहे, ते तुमच्या कुळाच्या विनाशाच कारण ठरेल. " त्यांनी असं सांगितल्यावर सर्व यादव घाबरले आणि त्यांनी त्या कढई चे तुकडे करून टाकले. ते तुकडे त्यांनी जवळच्या एका नदीत टाकून दिले. हे छोटे तुकडे नंतर किनाऱ्यावर येऊन तिथल्या झाडा - झुडुपात अडकून राहिले. एक दिवस दारूच्या नशेत यादवांनी आपापसात लढाई केली आणि याच तुकड्यांनी एकमेकांचे मुडदे पाडले.
परंतु सर्वात मोठा तुकडा एका माश्याने खाल्ला होता. एका कोळ्याने तो तुकडा एका शिकाऱ्याला विकला. त्याने त्यापासून एक बाण बनवला. तो घेऊन तो जंगलात शिकारीला गेला. एका झाडीत हालचाल जाणवली म्हणून त्याने त्या दिशेला नेम धरून बाण मारला. परंतु तो बाण लागल्यावर मनुष्याच्या कण्हण्याचा आवाज आला म्हणून त्याने जाऊन बघितले. तो कृष्ण होता जो झाडीत लपला होता. त्याच्या पायाला बाण लागला होता, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे शेवटचा यदुवंशी देखील संपून गेला.