Android app on Google Play

 

युद्धासाठी योग्य ठिकाण

 


जेव्हा युद्ध सुरु होण्याची चिन्ह दिसत होती तेव्हा कृष्ण योग्य जागेच्या शोधात होता.
तो एका ठिकाणावरून जात असताना त्याने पाहिलं की एक स्त्री आपल्या एका हातात लहान मूल आणि दुसऱ्या हातात आपल्या पतीसाठी जेवण घेऊन शेतावर जात होती.
काही कारणाने शेताची वई (संरक्षक भिंत) मोडली होती आणि त्यातून पाणी  बाहेर वाहून जात होतं. स्त्रीने मुलाला त्या जागेत बसवलं, जेणेकरून पाणी वाहायचं थांबेल आणि तिच्या पिकाला नुकसान होणार नाही. हे पाहून कृष्णाला वाटलं की हेच स्थान योग्य आहे, कारण या स्थानावर त्याने एका आईच्या वात्सल्याचा खून होताना पाहिला, आणि त्याने त्या स्थानाला कुरुक्षेत्राच्या युद्धासाठी निवडलं.