Get it on Google Play
Download on the App Store

सोन्यामारुति 25

वेदपुरुष :  बाळ! सर्वत्र एकच वस्तु तुला दिसेल. कण्हणें, विव्हळणें, रडणें हेंच ऐकूं येईल. फुटकीं दोन-चार भांडीं, फाटकीं लक्तरे, मोडक्या खाटा, दोनचार गोणपाटें, यांशिवाय काय दिसणार आहे ? तुला गादीलोड दिसणार नाहीं. टेबलखुर्ची दिसणार नाहीं. हंड्या, झुंबरे, चित्रें, तसबिरी दिसणार नाही, तबला नाहीं, तंबोरा नाहीं, सतार नाहीं, पेटी नाहीं, पुस्तकें नाहींत, कपाटें नाहींत, मुलांची खेळणी नाहींत. परकरपोलकीं नाहींत, टमाटो बटाटे नाहींत, गुलकंद मुलकंद मुरांबे नाहींत. कांहीं नाहीं.

वसंता : या घाणींत यांना कसें राहवतें ? ही घाण हे दूर कां करीत नाहींत ?

वेदपुरुष : दिवसभर कारखान्यांत काम करून मरून आलेला मजूर पुन्हा येथें साफसफाई कसा करील ? थोडा तरी उत्साह त्याचा शिल्लक उरतो का ? त्या लक्षाधीश शेटांचे हें कर्तव्य नाहीं का ? येथें आणखी दहा संडास बांधून स्वच्छता निर्माण करणें हें त्यांचे नाहीं का काम ? परंतु तिकडे लक्ष न देतां चालले मसुरीला भडभुंजे! या मजुरांचे संडास कोणीं साफ करावयाचे ? अधिक संडास नको होते का ? परंतु मग खर्च थोडा जास्त येईल! मजुरांना नरकाची थोडीच किळस येत असेल ? त्या श्रीमंतांची तोंडे येथें संडासांत घासलीं पाहिजेत, म्हणजे समजेल. परंतु ते कोणीं करायचे ? हें तुम्हीं केलें पाहिजे. खर्‍या सोन्यामारुतीच्या पूजकांनी केलें पाहिजे. दगडी सोन्यामारुतींपुढच्या त्या सर्व लब्धप्रतिष्ठितांना धरून आणून या जिवंत सोन्यामारुतींची स्थिति सुधारावयास लावलें पाहिजे. तुमचे तरुणांचें हें महान्  कर्म आहे. हा खरा मानवधर्म तुम्हांला हांक मारीत आहे.

वसंता : वेदपुरुषा! त्या उद्यांच्या सभेंत बराच गोंधळ होईल नाहीं ?

वेदपुरुष : सोन्यामारुतींना लाथा बसतील. सोन्यामारुतींच्या पाठींत स्वयंसेवकसंघाचे सोटे बसतील.

वसंता : आपण तेथें जाऊं हां.

वेदपुरुष : बरें, तुला थोडी विश्रांति घ्यायची आहे का ?

वसंता : हो.

वेदपुरुष : ह्या फुलाच्या कळींत तूं झोंप.

वसंता : आणि तुम्ही ?

वेदपुरुष : मला कधीं झोंप नसते. वेदाला झोपून चालत नाहीं. वेद सदैव जागृत पाहिजे. विचाराला झोंप लागली म्हणजे सारें विश्व थांबलेंच समज. आज तुमच्या देशांत विचाराला झोंप लागली आहे म्हणून तर हें दास्य पदरीं आलें आहे. नीज जा. सुगंधाच्या व सौदर्याच्या जवळ झोंप. पावित्र्याच्या व माधुर्याच्याजवळ झोंप. जा.

वसंता हळूच कळींत शिरला. कळीला कळलेंहि नाहीं. त्या पातळ पाकळ्या! परंतु वसंताला थंडी लागलीं नाहीं. तेथें प्रेमाची ऊब होती.

वेदपुरुष सूत्रें म्हणत वार्‍याबरोबर फिरत होता; तार्‍यांबरोबर बोलत होता.

सोन्यामारुति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सोन्यामारुति 1 सोन्यामारुति 2 सोन्यामारुति 3 सोन्यामारुति 4 सोन्यामारुति 5 सोन्यामारुति 6 सोन्यामारुति 7 सोन्यामारुति 8 सोन्यामारुति 9 सोन्यामारुति 10 सोन्यामारुति 11 सोन्यामारुति 12 सोन्यामारुति 13 सोन्यामारुति 14 सोन्यामारुति 15 सोन्यामारुति 16 सोन्यामारुति 17 सोन्यामारुति 18 सोन्यामारुति 19 सोन्यामारुति 20 सोन्यामारुति 21 सोन्यामारुति 22 सोन्यामारुति 23 सोन्यामारुति 24 सोन्यामारुति 25 सोन्यामारुति 26 सोन्यामारुति 27 सोन्यामारुति 28 सोन्यामारुति 29 सोन्यामारुति 30 सोन्यामारुति 31 सोन्यामारुति 32 सोन्यामारुति 33 सोन्यामारुति 34 सोन्यामारुति 35 सोन्यामारुति 36 सोन्यामारुति 37 सोन्यामारुति 38 सोन्यामारुति 39 सोन्यामारुति 40 सोन्यामारुति 41 सोन्यामारुति 42 सोन्यामारुति 43 सोन्यामारुति 44 सोन्यामारुति 45 सोन्यामारुति 46 सोन्यामारुति 47 सोन्यामारुति 48 सोन्यामारुति 49 सोन्यामारुति 50 सोन्यामारुति 51 सोन्यामारुति 52 सोन्यामारुति 53 सोन्यामारुति 54 सोन्यामारुति 55 सोन्यामारुति 56 सोन्यामारुति 57 सोन्यामारुति 58 सोन्यामारुति 59 सोन्यामारुति 60 सोन्यामारुति 61 सोन्यामारुति 62 सोन्यामारुति 63 सोन्यामारुति 64 सोन्यामारुति 65 सोन्यामारुति 66 सोन्यामारुति 67 सोन्यामारुति 68 सोन्यामारुति 69 सोन्यामारुति 70 सोन्यामारुति 71 सोन्यामारुति 72 सोन्यामारुति 73 सोन्यामारुति 74 सोन्यामारुति 75 सोन्यामारुति 76 सोन्यामारुति 77 सोन्यामारुति 78 सोन्यामारुति 79 सोन्यामारुति 80 सोन्यामारुति 81 सोन्यामारुति 82 सोन्यामारुति 83 सोन्यामारुति 84 सोन्यामारुति 85 सोन्यामारुति 86 सोन्यामारुति 87 सोन्यामारुति 88 सोन्यामारुति 89 सोन्यामारुति 90 सोन्यामारुति 91 सोन्यामारुति 92 सोन्यामारुति 93 सोन्यामारुति 94 सोन्यामारुति 95 सोन्यामारुति 96 सोन्यामारुति 97 सोन्यामारुति 98 सोन्यामारुति 99 सोन्यामारुति 100 सोन्यामारुति 101 सोन्यामारुति 102 सोन्यामारुति 103 सोन्यामारुति 104 सोन्यामारुति 105 सोन्यामारुति 106 सोन्यामारुति 107 सोन्यामारुति 108 सोन्यामारुति 109 सोन्यामारुति 110 सोन्यामारुति 111 सोन्यामारुति 112 सोन्यामारुति 113 सोन्यामारुति 114 सोन्यामारुति 115 सोन्यामारुति 116 सोन्यामारुति 117 सोन्यामारुति 118 सोन्यामारुति 119 सोन्यामारुति 120 सोन्यामारुति 121 सोन्यामारुति 122