Get it on Google Play
Download on the App Store

सोन्यामारुति 14

वेदपुरुष : जगभर मारुती स्थापावयाचे नाहींत. ते स्थापिलेले आहेतच. त्यांची ओळख करून घ्यावयाची आहे. त्यांची पूजा करावयास जावयाचें आहे. त्यांच्या भोंवतीं प्रदक्षिणा घालावयाच्या आहेत. त्यांना नैवेद्य द्यावयाचे आहेत. त्यांचा जयजयकार करावयाचा आहे. जिकडे तिकडे सोन्यामारुती आहेत. परंतु पाहतो कोण ? तुझे लहान तरुण मित्र हे अनंत मारुती पहावयास शिकले आहेत, शिकत आहेत. त्यांना ती दिव्य दृष्टि येत आहे. या अनंत सोन्यामारुतींसाठीं ते जन्मभर सत्याग्रह करणार आहेत, गोळी खाणार आहेत, फांशी जाणार आहेत! वाटेल तो त्याग करावयास ते तयार आहेत! तुझ्या मित्रांची दृष्टि तूं नाहीं का घेणार ? ते तुला भेटायला उत्सुक आहेत! आपला वसंता मागें राहिल कीं काय अशी त्यांना शंका येत आहे. तुझे तेजस्वी मित्र तुला आपल्या झेंड्याखालीं घेतल्याशिवाय राहणार नाहींत. त्यांची तळमळ तुला ओढून घेईल. नव्या विश्वव्यापी झेंड्याखाली तुला झगडावयास ते उभे करतील.

वसंता : कोणता नवीन झेंडा ? भगवा झेंडा मला माहीत आहे. हिंदुस्थानचा तिरंगी झेंडा मला माहीत आहे. आणखी कोणता झेंडा ?

वेदपुरुष : भगवा झेंडा महाराष्ट्रापुरता! तिरंगी झेंडा हिंदुस्थानपुरता! सार्‍या जगाला आपल्याखालीं घेणारा असा झेंडा नको का ? सर्व जगाचें एकीकरण करणारा असा झेंडा तुझे मित्र हातांत घेत आहेत. हे भगवे झेंडे, हे तिरंगी झेंडे यांना त्या विश्वव्यापी झेंड्यांत पुढेमागे नम्रपणानें मिळावें लागेल. यमुना गंगेला मिळेल, गंगा सागराला मिळेल. शेवटीं महान् वस्तूंत सर्वांनी समरस झालें पाहिजे. महाराष्ट्रानें भारतांत मिळालें पाहिजे. भारतानें जगांत मिळालें पाहिजे. जगानें विश्वांत मिळालें पाहिजे महान् वस्तूशीं मिळून रहा. नाहीं तर मराल, संपाल, खलास व्हाल. भगवा झेंडा राष्ट्रीय झेंडा जगाच्या ऐक्यध्वजाशीं अविरोधानें वागणार नसेल तर राष्ट्रीय ध्वजहि एक दिवस धुळीस मिळेल! स्वतंत्र अस्तित्व राखूनहि समरस होतां येतें.

वसंता : सर्व जगाच्या ऐक्याचा झेंडा! केवढी महान. कल्पना! केवढें विशाल ध्येय!

वेदपुरुष : महाराष्ट्रांतील सोन्यामारुतीचा भगवा झेंडा असेल, परंतु जगांतील जे अनंत सोन्यामारुती आहेत त्यांचा झेंडा लाल आहे! हजारो, लाखों, कोटयवधि सोन्यामारुतींचा तो झेंडा तूं पाहिला आहेस का ?

वसंता : कोठें आहेत हे लाखों सोन्यमारुती ?

वेदपुरुष : सर्वत्र आहेत. आळीआळींत आहेत, गल्लीगल्लींत आहेत, घरोघर आहेत.

वसंता : मला कां नाहीं दिसत! आमच्या घरमालकाकडे कोठें आहे. सोन्यामारुति ? त्यांच्या घरांतील देवांत आहे ?

वेदपुरुष : तुझ्या घरमालकांच्या घरीं रोज सोन्यामारुती येतात. परंतु त्यांना लाथा बसतात.

वसंता : सोन्यामारुतीला लाथा ?

वेदपुरुष : हो. लाथांवर लाथा.

वसंता : सोन्यामारुति बुभु:कार कां करीत नाहीं ? खरा मारुति लंकेची होळी करतो. रावणाला रगडून टाकितो.

वेदपुरुष : होय. हे सोन्यामारुती एक दिवस गर्जना करतील. परमेश्वर आधीं वाट पाहतो. परंतु आशातंतु तुटला कीं मग तो प्रळयकाळ आणतो. परमेश्वराचीं दोन रुपें ओत.

वसंता : कोणतीं ?

वेदपुरुष : एक शिवस्वरुप व दुसरें रुद्रस्वरुप. सोन्यामारुति आधीं चवताळत नाहीं. सारे सहन करतो. परंतु रामानें आश्वासन दिलें, रामाची आज्ञा झाली की तो रुद्ररुप धारण करतो. जगाचा प्रळय ओढवतो. सोन्यामारुति अजून सहन करीत आहे. परंतु लोक जर सारख्याच लाथा मारतील तर सोन्यामारुति जागृत होईल. त्यास राम भेटेल. रामाची भेट होतांच सोन्यामारुति लाथा मारणार्‍या रावणांना धुळींत मिळवील. सारी सोन्याची लंका जाळून भस्म करील.

सोन्यामारुति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सोन्यामारुति 1 सोन्यामारुति 2 सोन्यामारुति 3 सोन्यामारुति 4 सोन्यामारुति 5 सोन्यामारुति 6 सोन्यामारुति 7 सोन्यामारुति 8 सोन्यामारुति 9 सोन्यामारुति 10 सोन्यामारुति 11 सोन्यामारुति 12 सोन्यामारुति 13 सोन्यामारुति 14 सोन्यामारुति 15 सोन्यामारुति 16 सोन्यामारुति 17 सोन्यामारुति 18 सोन्यामारुति 19 सोन्यामारुति 20 सोन्यामारुति 21 सोन्यामारुति 22 सोन्यामारुति 23 सोन्यामारुति 24 सोन्यामारुति 25 सोन्यामारुति 26 सोन्यामारुति 27 सोन्यामारुति 28 सोन्यामारुति 29 सोन्यामारुति 30 सोन्यामारुति 31 सोन्यामारुति 32 सोन्यामारुति 33 सोन्यामारुति 34 सोन्यामारुति 35 सोन्यामारुति 36 सोन्यामारुति 37 सोन्यामारुति 38 सोन्यामारुति 39 सोन्यामारुति 40 सोन्यामारुति 41 सोन्यामारुति 42 सोन्यामारुति 43 सोन्यामारुति 44 सोन्यामारुति 45 सोन्यामारुति 46 सोन्यामारुति 47 सोन्यामारुति 48 सोन्यामारुति 49 सोन्यामारुति 50 सोन्यामारुति 51 सोन्यामारुति 52 सोन्यामारुति 53 सोन्यामारुति 54 सोन्यामारुति 55 सोन्यामारुति 56 सोन्यामारुति 57 सोन्यामारुति 58 सोन्यामारुति 59 सोन्यामारुति 60 सोन्यामारुति 61 सोन्यामारुति 62 सोन्यामारुति 63 सोन्यामारुति 64 सोन्यामारुति 65 सोन्यामारुति 66 सोन्यामारुति 67 सोन्यामारुति 68 सोन्यामारुति 69 सोन्यामारुति 70 सोन्यामारुति 71 सोन्यामारुति 72 सोन्यामारुति 73 सोन्यामारुति 74 सोन्यामारुति 75 सोन्यामारुति 76 सोन्यामारुति 77 सोन्यामारुति 78 सोन्यामारुति 79 सोन्यामारुति 80 सोन्यामारुति 81 सोन्यामारुति 82 सोन्यामारुति 83 सोन्यामारुति 84 सोन्यामारुति 85 सोन्यामारुति 86 सोन्यामारुति 87 सोन्यामारुति 88 सोन्यामारुति 89 सोन्यामारुति 90 सोन्यामारुति 91 सोन्यामारुति 92 सोन्यामारुति 93 सोन्यामारुति 94 सोन्यामारुति 95 सोन्यामारुति 96 सोन्यामारुति 97 सोन्यामारुति 98 सोन्यामारुति 99 सोन्यामारुति 100 सोन्यामारुति 101 सोन्यामारुति 102 सोन्यामारुति 103 सोन्यामारुति 104 सोन्यामारुति 105 सोन्यामारुति 106 सोन्यामारुति 107 सोन्यामारुति 108 सोन्यामारुति 109 सोन्यामारुति 110 सोन्यामारुति 111 सोन्यामारुति 112 सोन्यामारुति 113 सोन्यामारुति 114 सोन्यामारुति 115 सोन्यामारुति 116 सोन्यामारुति 117 सोन्यामारुति 118 सोन्यामारुति 119 सोन्यामारुति 120 सोन्यामारुति 121 सोन्यामारुति 122