Get it on Google Play
Download on the App Store

सोन्यामारुति 13

वसंता : मला वाईट वाटत आहे.  लोक कांहींहि करोत.  मला तरी स्वत:ची फसवणूक करून चालणार नाहीं.  मी पुण्यांत जाईन. पुण्यांतील रस्त्यारस्त्यांत, गल्लीगल्लींत ओरडत जाईन.  ''धर्मावर संकट आहे.  हिंदूंनो!  उठा. अरे, घरीं काय झोपा झोडतां ?  रेडियो काय ऐकतां ?  विजेच्या पंख्यांचा वारा काय घेतां ? अरे निघा! भगवा झेंडा बोलवीत आहे.  समर्थ बोलवीत आहेत,''  अशी मी गर्जना करीन. तुम्ही हंसतांसे ? मी लहान आहें म्हणून ? लहान मुलांनींच पराक्रम केले. ध्रुव लहान होता,  रोहिदास लहान होता,  अभिमन्यु लहान होता, उपमन्यु लहान होता. हें काय हंसतांसे ?  हीं पुराणांतील नांवें म्हणून हंसतां ? रामदास लहान होते, ज्ञानदेव लहान होते, शिवाजी महाराज लहान होते, माधवराव पेशवे लहान होते, विश्वासराव लहान होते, जनकोजी लहान होते. हें काय ? तुम्हीं हंसतांसे ?  ही पूर्वजांची कीर्ति म्हणून ?  आजहि लहान मुलें पराक्रम करीत आहेत.  बाबु गेनु लहान होता, सुभान लहान होता, रामा लहान होता, तो घरून पळून गेलेला दयाराम लहान होता.  सारे लहान वीर तुरुंगांत गेले.  आम्ही देशासाठीं मुलें तुरुंगांत गेलो.  आम्ही धर्मासाठीं नाहीं का जाणार ?  माझे सारे मित्र पुन्हा नाहीं का सत्याग्रहाला येणार ?

वेदपुरुष : ह्या सत्याग्रहासाठीं येणें शक्य नाहीं. तरुण मुलें आतां असल्या गोष्टीसाठीं उठणार नाहींत. फार करून पेटणार नाहींत. तुझे मित्र तुला हंसतील; रामा, दयाराम सारे तुला हंसतील.

वसंता : कां बरे ? त्यांना का त्याग आवडतनासा झाला ? ते का संसारांत पडले, चिखलांत रुतले ? गाणेंबजावणें, खाणेंपिणें याच्या पलीकडे त्यांना नाहीं का कांहीं दिसत ? छे:! असें कसें होईल ? ते दिलदार तरुण आहेत. मी त्यांना हांका मारीन. ''सोन्यामारुतीची पूजा करूं चला सारे'' असें मी म्हणेन. ते येतील.

वेदपुरुष : ते येणार नाहींत.

वसंता : त्यांचा का देवधर्मावर आतां विश्वास नाहीं ? देव म्हणजे का ते थट्टा समजतात ? सोन्यामारुतीसमोर ते आपलें शिर नाहीं का नमविणार, आपलें शरीर नाहीं का देणार ?

वेदपुरुष : ते दुसर्‍या सोन्यामारुतींची उपासना करूं लागले आहेत.

वसंता
: कोठें आहेत ते दुसरे सोन्यामारुती ? क-हाडला का कोल्हापूरला ? नगरला का नाशीकला ? तेथेंहि का सत्याग्रह सुरू झाला आहे ? धर्मांसाठीं महाराष्ट्र, सारा महाराष्ट्र पेटत आहे, होय ना ?

वेदपुरुष : सारा महाराष्ट्रच नाहीं, सारें भरतखंड पेटत आहे.  सोन्यामारुतीची पूजा सारें जग करूं लागणार आहे. त्यांच्यासाठी हे पंधरा तीनवारांचे सत्याग्रहच नाहीं, तर प्राणांची कुरोंडी जग करणार आहे.

वसंता
: सारें जग सोन्यामारुतीची पूजा करणार ? समर्थांनी अकराशे मारुती स्थापन केले ? आतां का जगभर मारुती स्थापले जाणार ?  हिंदुधर्माचा विजय असो!

वेदपुरुष : ते येणार नाहींत.

वसंता : त्यांचा का देवधर्मावर आतां विश्वास नाहीं ? देव म्हणजे का
ते थट्टा समजतात ? सोन्यामारुतीसमोर ते आपलें शिर नाहीं का नमविणार, आपलें शरीर नाहीं का देणार ?

वेदपुरुष : ते दुसर्‍या  सोन्यामारुतींची उपासना करूं लागले आहेत.

वसंता
: कोठें आहेत ते दुसरे सोन्यामारुती ? कऱ्हाडला का कोल्हापूरला ? नगरला का नाशीकला ? तेथेंहि का सत्याग्रह सुरू झाला आहे ? धर्मांसाठीं महाराष्ट्र, सारा महाराष्ट्र पेटत आहे, होय ना ?

वेदपुरुष : सारा महाराष्ट्रच नाहीं, सारें भरतखंड पेटत आहे.  सोन्यामारुतीची पूजा सारें जग करूं लागणार आहे. त्यांच्यासाठी हे पंधरा तीनवारांचे सत्याग्रहच नाहीं, तर प्राणांची कुरोंडी जग करणार आहे.

वसंता
: सारें जग सोन्यामारुतीची पूजा करणार ? समर्थांनी अकराशे मारुती स्थापन केले ? आतां का जगभर मारुती स्थापले जाणार ? हिंदुधर्माचा विजय असो!

सोन्यामारुति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सोन्यामारुति 1 सोन्यामारुति 2 सोन्यामारुति 3 सोन्यामारुति 4 सोन्यामारुति 5 सोन्यामारुति 6 सोन्यामारुति 7 सोन्यामारुति 8 सोन्यामारुति 9 सोन्यामारुति 10 सोन्यामारुति 11 सोन्यामारुति 12 सोन्यामारुति 13 सोन्यामारुति 14 सोन्यामारुति 15 सोन्यामारुति 16 सोन्यामारुति 17 सोन्यामारुति 18 सोन्यामारुति 19 सोन्यामारुति 20 सोन्यामारुति 21 सोन्यामारुति 22 सोन्यामारुति 23 सोन्यामारुति 24 सोन्यामारुति 25 सोन्यामारुति 26 सोन्यामारुति 27 सोन्यामारुति 28 सोन्यामारुति 29 सोन्यामारुति 30 सोन्यामारुति 31 सोन्यामारुति 32 सोन्यामारुति 33 सोन्यामारुति 34 सोन्यामारुति 35 सोन्यामारुति 36 सोन्यामारुति 37 सोन्यामारुति 38 सोन्यामारुति 39 सोन्यामारुति 40 सोन्यामारुति 41 सोन्यामारुति 42 सोन्यामारुति 43 सोन्यामारुति 44 सोन्यामारुति 45 सोन्यामारुति 46 सोन्यामारुति 47 सोन्यामारुति 48 सोन्यामारुति 49 सोन्यामारुति 50 सोन्यामारुति 51 सोन्यामारुति 52 सोन्यामारुति 53 सोन्यामारुति 54 सोन्यामारुति 55 सोन्यामारुति 56 सोन्यामारुति 57 सोन्यामारुति 58 सोन्यामारुति 59 सोन्यामारुति 60 सोन्यामारुति 61 सोन्यामारुति 62 सोन्यामारुति 63 सोन्यामारुति 64 सोन्यामारुति 65 सोन्यामारुति 66 सोन्यामारुति 67 सोन्यामारुति 68 सोन्यामारुति 69 सोन्यामारुति 70 सोन्यामारुति 71 सोन्यामारुति 72 सोन्यामारुति 73 सोन्यामारुति 74 सोन्यामारुति 75 सोन्यामारुति 76 सोन्यामारुति 77 सोन्यामारुति 78 सोन्यामारुति 79 सोन्यामारुति 80 सोन्यामारुति 81 सोन्यामारुति 82 सोन्यामारुति 83 सोन्यामारुति 84 सोन्यामारुति 85 सोन्यामारुति 86 सोन्यामारुति 87 सोन्यामारुति 88 सोन्यामारुति 89 सोन्यामारुति 90 सोन्यामारुति 91 सोन्यामारुति 92 सोन्यामारुति 93 सोन्यामारुति 94 सोन्यामारुति 95 सोन्यामारुति 96 सोन्यामारुति 97 सोन्यामारुति 98 सोन्यामारुति 99 सोन्यामारुति 100 सोन्यामारुति 101 सोन्यामारुति 102 सोन्यामारुति 103 सोन्यामारुति 104 सोन्यामारुति 105 सोन्यामारुति 106 सोन्यामारुति 107 सोन्यामारुति 108 सोन्यामारुति 109 सोन्यामारुति 110 सोन्यामारुति 111 सोन्यामारुति 112 सोन्यामारुति 113 सोन्यामारुति 114 सोन्यामारुति 115 सोन्यामारुति 116 सोन्यामारुति 117 सोन्यामारुति 118 सोन्यामारुति 119 सोन्यामारुति 120 सोन्यामारुति 121 सोन्यामारुति 122