Get it on Google Play
Download on the App Store

महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या

श्रीगणेशाय नम:|| ऋषी म्हणाले,"सूतजी, व्यासांच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ झालेले आहात.तुम्हाला माहित नाही असे या जगात काहीही नाही.म्हणून आम्ही तुम्हाला असे विचारू इच्छितो कि,या जगात तुम्ही वर्णन केलेल्या लिंगाची पूजा होते कि इतरही लिंगे पूजनीय आहेत ? तसेच आम्ही असेहि ऐकले आहे कि, शिवप्रिया पार्वती हीच बाण रूप झालेली आहे. त्यामागे काय कारण आहे ? याबाबतीत तुम्हाला काही माहित असेल तर अवश्य सांगा." सुत म्हणाले, "श्रेष्ठ ब्राह्मणांनो ! एका कल्पात घडलेला हा प्रसंग मी व्यास महर्षीकडून ऐकला आहे, तो तुम्हाला सांगतो. प्राचीन काळी दारूवनात अनेक शिवभक्त ऋषी राहत होते. ते शिवाजींचे त्रिकाळ पूजन करत असत. अनेक प्रकारच्या स्तोत्रांनी त्यांची स्तुती करत असत. त्यांचे ध्यान करत असत. एके दिवशी ते ऋषी समिधा आणण्यासाठी वनात गेले होते. तेव्हा शिवाजींनी त्यांच्या कल्याणार्थ एक विचित्र लीला केली. ते विकत रूप धारण करुन्त्यांच्या आश्रमापाशी आले. त्यांचे विभूतीचे भूषित, अत्यंत तेजस्वी, हाती ज्योतिर्लिंग घेतलेले आणि कामुकाप्रमाणे चेष्टा करणारे दिगंबर स्वरूप पाहून ऋषीस्त्रियांना मोठे आश्चर्य वाटले. त्याही कामव्याकूळहोवून एकमेकींना आलिंगन देऊ लागल्या." थोड्या वेळाने सर्व ऋषी आश्रमात परतले. आपल्या स्त्रियांचे विरुद्ध रूप आणि त्यांचे विचित्र वर्तन पाहून त्यांना फार दुख झाले. त्यांनी दिगंबर स्वरूपातील त्या विकत पुरुषाला पहिले. हि सर्व त्याचीच करणी आहे हे जाणून त्यांना राग आल. त्यांनी विचारले," तू कोण आहेस ? येथे कशासाठी आला आहेस ?" पण त्याने काहीही उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांना अधिकच संताप आला. ते म्हणाले, " तू वेदामार्गाचा लोप करणारा आणि विरुद्ध कार्य करणारा आहेस. तुझ्यासारख्याने शिवलिंग धारण कदापि योग्य नाही. ते भूमीवर गळून पडेल." तेव्हा अदभूतरूपधारी शिवाजींच्या हातातील दिव्या लिंग तत्काळ खाली पडले आणि अग्निसमान प्रज्वलित होऊन सर्वकाही जळत सुटले. ते कोठेही स्टीर राहिले नाही. पाताळ, स्वर्ग आदी ज्या-ज्या ठिकाणी ते गेले, तेथे-तेथे सर्व जाळूनच टाकले. त्यामुळे त्रैलोक्यात मोठा हाहाकार झाला. देव, मानव, ऋषी आणि मुनी अत्यंत दुखी झाले. व्याकूळ हून तडफडू लागले. हा प्रकार पाहून दारूवानातले ऋषी फार व्यथित झाले. ते ब्राम्हजींना शरण गेले. त्यांना नमस्कार केला व घडलेली सर्व हकीकत निवेदन केली. तेव्हा ब्राम्हजी म्हणाले, "ब्राम्हनांनो ! अज्ञानी लोकांनी असे केले असते, तर मी काही बोललो नसतो. पण तुम्ही ज्ञानी आहात, म्हणून युमाच्याकडून हे निंद्य कर्म घडले याचेच मला नवल वाटले आहे, भगवान शिवाजींचा विरोध करून आपले कल्याण होईल, असे कोणी समजू नये. जो मनुष्य मध्यान्हसमयी आलेल्या अठीतीचा सत्कार करत नाही, तो अतिथी त्याचे पुण्य हरण करतो.आपले पाप त्याला देऊन निघून जातो. तेथे साक्षात शिवाजीच अतिथी म्हणून आले होते. पण तुम्ही त्यांना ओळखले नाही आणि त्यांच्या हातातील दिव्या शिवलिंग खली पडेल असे बोलून मोकळे झालात. आता जोपर्यंत ते शुभ शिवलिंग कोठे स्टीर होत नाही, तो पर्यंत ते त्रालोक्याला जळतच राहणार यात संशय नाही." ते ऐकून ऋषी भयभीत झाले, ते म्हणाले,"ब्रम्हण, आमच्याकडून खरोखरच फार मोठा प्रमाद पडला आहे. आता आम्ही काय करावे ते सांगा." ब्राम्हजी म्हणाले,"ऋषीनो, तुम्ही जगाच्या हितासाठी जगदंबा पार्वतीची आराधना करा. मग शिवप्रभुंची प्रार्थना करा, गीरीजेने योनी रूप धारण केले, तरच ते ज्योतिर्लिंग स्टीर होईल.आता मी तुम्हाला एक विधी सांगतो, तो लक्ष्यपूर्वक ऐका. त्या विधीनुसार आराधना केल्याने पार्वती तुमच्यावर प्रसन्न होईल. शास्त्राला अनुसरून अष्टदल कमाल काढा. त्यावर एक घट स्थापन करा. त्यात दुर्वा, जवांचे अंकुर व तीर्थातील जल घाला. तो कुंभ वेदमंत्रांनी अभिमंत्रित करा. शिवाजींचे स्मरण करून त्या घटाची शास्त्रोक पूजा करा. त्यातील जाळणे त्या शिवलिंगाला शतरुद्रीय मंत्रांनी अभिषेक करा.मग त्याच मंत्रांनी मार्जन करा. योनीरुप गिरीजा व बाणाची स्थापना करा. त्यावर लिंगाची स्थापना करा. त्याच्यावर पुन्हा मार्जन करा.चंदन, सुगंधी फुले, धूप, दीप, व नैवेद्य हे पंचोपचार अर्पण करून त्र्याची पूजा करा. शिवलिंगाला नमस्कार करून त्याची स्तुती करा. त्याचा जयजयकार करून पुढील प्रार्थना करा.-हे शिवप्रभू तुम्ही देवांचे देव आहात. संपूर्ण विश्वाला आनंद देणारे आहात. तुम्ही अविनाशी आहात. महेश्वर आहात. या जगाचे आदिकारण आहात. तुम्हीच उत्पत्ती-स्थिती-लयकर्ते आहात. सर्वांच्या अंतर्यामी वास करणारे आहात. आमच्या अपराधना क्षमा करून शांत व्हा.लोकांना द्या करून त्यांचे पालन करा." याप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टी भावभक्तीने करा, म्हणजे ते शिवलिंग शांत आणि स्थिर होईल. त्रैलोक्यातील उत्पात थांबतील व सर्वाना सुख मिळेल." ब्रम्हजींचे बोलणे ऐकून त्या ऋषींना मोठे समाधान वाटले. ते शिवजींना शरण गेले. परम भक्तीने त्यांची पूजा केली. त्यांचा सत्कार केला. त्यामुळे भक्तवत्सल शिवप्रभू प्रसन्न झाले. ते म्हणाले ," ऋषीनो माझे शिवलिंग योनिरपणे धारण केले तरच ते शांत होईल आणि सर्न लोकांना सुख मिळेल. माझे ज्योतिर्लिंग धारण करण्यास फक्त पार्वतीच समर्थ आहे. तिने धारण केल्यावर ते तत्काळ शांत होईल." त्याप्रमाणे ऋषींनी ब्रम्हाजीनी सांगितलेल्या विधीनुसार देवी पार्वतीची व शिवाजींची आराधना केली. त्या पूजनाने प्रसन्न झालेली पार्वती योनिरुपणे स्तीत झाली. ऋषींनी तीत शिवजींच्या ज्योतिर्लिंगाची विधीपूर्वक स्थापना केली. तेव्हा ते शांत आणि स्टीर झाले. ते पाहून सर्वाना मोठा आनंद झाला. जगात सुख शांती नंदू लागली.ब्रम्हा, विष्णू आदी देवांनी , श्रेष्ठ ऋषींनी आणि त्रैलोक्यातील सर्व मान्यवरांनी त्या ज्योतिर्लिंगाची विशेष पूजा केली. शिवपार्वतीची प्रतिमा असलेले ते दिव्य ज्योतिर्लिंग हाटकेश नावाने त्रिखंडात प्रसिद्ध झाले. त्यात शिव हा पुरुष आहे आणि पार्वती प्रकृती आहे. त्या शिवलिंगाचे पूजन केल्याने लोकांना सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. ते दिव्या लिंग इहलोकी समृद्धी आणि परलोकी परम गती (मोक्ष) देणारे आहे."

शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1 कल्की अवतार अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2 योगसामर्थ्य 1 योगसामर्थ्य 2 तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1 तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2 कसबा गणपती इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव रुद्राभिषेक भविष्यकथानाची सिद्धी 1 भविष्यकथानाची सिद्धी 2 भविष्यकथानाची सिद्धी 3 शोध अश्वत्थामाचा 3 Naustradamus 1 Naustradamus 2 कोकणेश्वर महादेव लावणी ६४ वी एका अप्सरेच्या मुली नेपाळमध्ये मोठा भूकंप मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले जगातील सहा न उलगडलेले रहस्य . चेटकीण प्रथेचा काळा इतिहास संत नामदेव शिव भारतामधील Top 10 मंदिरे दैवी शक्ती पृथ्वीच्या पाठीवर सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र वास्तुपुरुष गुढीपाडवा देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये पोस्ट दैवी शक्तीं मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना ......... संतांचा सहवास सध्या दैवी शक्ती ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।। ।।ॐ।। ओम नम: शिवाय। भारताने लावलेले शोध योगीराज संत सोहिरोबानाथ... महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी द अंबेर रुम मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय? हिंदू धर्म महाभारत एक प्राचीन ग्रंथ तीर्थस्थळाचे नाव महात्मा बसवेश्वर चैत्र शुद्ध नवमी गंगासागर भारतातील ऋषीमुनीं विमानाचा शोध भगवान श्रीकृष्ण महाराष्ट्रात महानुभाव अघोरी कुलइतिहास द्रौपदीला द्रौपदीचे वस्त्रहरण दत्ताची नावे आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था . आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा.. आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा.. भाग २ रा ....रुपकुंड श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला. भारतीय संस्कृती महाराज कोण होते, कोठून आले दैवी किंवा देवता ‘गावपळण!’ गणपती विषयी काळभैरव 13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा .... वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण गरुडपुराण प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती... || गणपती बाप्पा मोरया || अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ... श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात) मयंग : आसाम गावाचे नाव :- वालावल मल्हारी मार्तंड खंडोबा डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख .. दत्तावतारी **** भूतांचे प्रकार **** भाग १- Part - 1 पिशाच्च रुद्राक्ष भाग २ माफ करा वाचकांनो आजचे अनुभव ||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी|| चक्र आपण जानता आहात का ? गुरु सामर्थ्य मी तन्वी रेडी नामस्मरण नामसाधनेची येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार ! १९२१ सालची गोष्ट दिनदर्शिकेप्रमाणे महाभारतातल्या हिमालयीन यती/ हिममानव:- अखंड नामस्मर मनुष्य हा कल्पना विलास तबकड्या बहुधा पाण्यावर ध्यानावस्थेत भगवान पतंजली महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या सोमजाई देवीचा इतिहास लावणी ४४ वी