Android app on Google Play

 

शोध अश्वत्थामाचा 3

महाभारताचे जानकार लोकांना अश्वत्थामा बद्दल माहितच असेल. अश्वत्थामा हा महाभारतली एक मुख्य व्यक्तिरेखा होय. तुम्हाला वाचून आश्चर्य होईल,पण या जगात अश्वत्थामा चं अस्तित्व अजून ही आहेच. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. अशी मान्यता आहे कि असीरगढ व जबलपुर स्थित गौरीघाट(आजची नर्मदा नदी) च्या किनार्यावर आज सुध्दा अश्वत्थामा भटकताना काही भाग्यवंतांना दिसतो . अश्वत्थामा तिथल्या लोकांना आपल्या मस्तकातून वाहणार्या रक्ताला थांबवण्यासाठी हळद आणि तेल मांगतो असे स्थानिकांचे म्हणणे आहे . काही वेळा पीठ व तेल याची मागणी करतो . त्याच्या वेश एखाद्या फकीर प्रमाणे असतो . असीरगढ च्या किल्यात एक शिव मंदिर आहे जे बऱ्हाणपूर पासून २० किलोमीटर दूर आहे. दुसर्या एका मान्यतेनुसार त्या किल्याच्या शिव मंदिरात अश्वत्थामा आज पण रोज न चुकता पुजा पाठ करायला येतो. तिथेच एक तलाव आहे आणि त्या तलाव मध्येच आंघोळ करून अश्वत्थामा शिव मंदिर पुजा करायला जातो ,तर कोणी म्हणतो कि तो उतावली नदि मध्ये आंघोळ करून पुजेसाठी येथे येतो . सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट ही कि तो तलाव कधीच ओसाड नाही पडत अगदि बऱ्हाणपूर च्या जीवघेणा उन्हाळ्यात सुध्दा! याच तलाव च्या थोड पुढे गेलं कि एक गुप्तेश्वर महादेव चं मंदिर आहे.हे मंदिर उपसागरांत वसलेलं आहे. दंतकथे नुसार इथे असलेल्या पहाडा मधुन एकातून गुप्त रस्ता बनलेला आहे जो खांडव(आजचा खांडव जिला) जंगलातून होउन सरळ या मंदिराला येऊन पोचतो.याच रस्त्याचा वापर करून अश्वत्थामा मंदिरात जातात. या मंदिरात प्रकाश आणि आधुनिक व्यवस्था नसली,किँवा एखादा पक्षी सुध्दा तिथे जाण्यास असमर्थ असेल, तरी पण अश्वत्थामाची ही पुजा सुरूच आहे.याचा पुरावा म्हणजे शिवलिंगावर रोज न चुकता ताजे फुल व गुलाल चा चढावा होय. कोणालाच नाही माहित हा प्रकार कधीपासुन सुरु आहे.पण खरं आहे. लोकांनी तर खुद आपला अनुभव सांगितलेला आहे.त्यांचे म्हणणे आहे कि त्यांच्या आजोबांना अश्वत्थामा ला प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव आहे,आणि हे त्यांनी अनेकदा बोलून पण दाखवले आहे. हाच किस्सा बघा ना.एकदा काही लोक तलावात माँसे पकडण्यासाठी गेले तर कोणी त्यांना अंधारात मागून जोरात धक्का दिला. ज्याने त्यांना धक्का दिला कदाचित त्याला त्या लोकांचं तिथे येणे रुचले नाही .गावातल्या वृध्द लोकांच्या मते जर कोणी अश्वत्थामा ला प्रत्यक्षात बघितले तर आपलं मानसिक संतुलन गमावून बसतो. पण नेहमीच असे होते असे नाही . हे सगळं तर ठिक आहे पण तुम्हाला माहित आहे का कि महाभारत च्या काळातला अश्वत्थामा अजून ही का भटकत आहे ? तर त्यामागे सुध्दा एक एक कारण आहे, पांडवांच्या निष्पाप जीवांवर अश्व्थम्यने ब्रम्हास्त्रा प्रयोग केला , आणि त्याचीच किंमत म्हणजे तो अजुन ही भटकत राहतो. या मागची कथा अशी-"अश्वत्थामा,महाभारततली एक मुख्य व्यक्तिरेखा .त्याचा जन्म महाभारत च्या काळात म्हणजेच द्वापर युगात झाला होता.त्याचे पिता गुरू द्रोणाचार्य होते व कुरू वंश चे राजगुरू कृपाचार्य त्याचे मामा होते.द्रोणाचार्यांनीच कौरव आणि पांडवांना शास्र आणि शस्र विद्येत पारंगत केले होते. अश्वत्थामाचं नाव त्या काळातल्या महान योध्दा मध्ये घेतले जाते.महाभारताच्या युध्दा च्या वेळी हस्तिनापुर साठी असलेल्या आदर भावामुळे गुरू द्रोण ने कौरवांचा साथ देण्याचा निर्णय केला.आपल्या बाबांसारखाच अश्वत्थामा सुध्दा शास्र व शस्र विद्येत पटाईत होता.या बाप लेकाच्या जोडीने महाभारत युध्दात पांडव सेनाला बेदम करून सोडलं होतं.पांडव सेना यामुळे पुर्ण निरूत्साहित झाली होती.सगळी कडे निराशा पसरली होती.हे पाहून श्रीकृष्णाने युधिष्ठीर ला कुटनितीचा सहारा घेण्यास सांगितले.या कुटनितीच्या अंतर्गत युध्दात अश्वत्थामाची मृत्यू झाल्याची बातमी पसरवली.द्रोणाचार्याला ही दुःखद बातमी कळल्यावर त्यांनी धर्मराज युधिष्ठीर कडून मृत्यु मागचं खरं कारण जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.त्यावर युधिष्ठीर उत्तरले कि -"अश्वत्थामा हत्ती कि नर , हे मला माहित नाही "हे ऐकल्यावर गुरू द्रोण आपल्या पुत्र मृत्युच्या दुःखात आपले सगळे शस्र टाकून युध्दभुमीतच किँकर्तव्यविमूढ होउन बसले आणि याच क्षणाचा फायदा घेत पांचाल नरेश दुपद चा सुपुत्र धृष्टद्युम्न याने त्यांच्या वध केला. पमहाभारत युध्दाच्या समाप्तिनंतर अश्वत्थामा ने आपल्या बापाच्या मृत्युचा सूड उगवण्याचा निश्चय केला. आणि म्हणुन त्याने मग पांडव पुत्रांचा वध केला.आणि पांडव कुळाचा सवर्था नाश करण्यासाठी त्याने उत्तरेच्या गर्भात असलेल्या परिक्षित ला मारण्यासाठी ब्रम्हास्त्र त्याच्या वर सोडले , आणि तेव्हाच श्रीकृष्णाने परिक्षित ला वाचवले.अश्वत्थामाच्या या चुकि मुळे भगवान श्रीकृष्णाने त्याला शिक्षा म्हणुन त्याच्या मस्तकावरचा मणि काढून त्याला तेजहीन करून टाकले आणि एक युगांत भटकत राहण्याचा श्राप सुध्दा दिला." तेव्हापासूनच अश्वत्थामा आज पण भटकत आहे.अश्वत्थामाच्या अस्तित्वाबद्दल डॉ मोहम्मद शफी(प्रो.सेवा सदन महाविद्यालय बुरहानपुर) इतिहासविद्द म्हणतात कि " बऱ्हाणपूर चा इतिहास महाभारत काळ शी जुळून आहे.अगोदर ही जागा खांडव जंगलाला जुळून होती.किल्याचं नाव इथे असलेल्या एका मुख्य गाडीवान असा अहीर च्या नावावर ठेवण्यात आले होते.आणि त्याला हे रूप १३८० ई.मध्ये फारूखी वंशच्या बादशाहानी दिले होते.अश्वत् थामा बद्दल प्रचलिता दंतकथा तर मी आपल्या लहानपनापासून ऐकत आलो आहो.मानलं तर खरं नाहीतर खोटं.पण एक गोष्ट आहे कि या किल्याला पुष्कळ गुफा आहेत.यांचा दुसरा भाग कुठे जातो हे कोणालाच नाही माहित."पुढे ते म्हणतात"आणि जो पर्यँत गुफांचं रहस्य नाही उघडत तोपर्यँत या दंतकथेँच पण रहस्य उलगडणार नाही ."

शोध दैवी शक्तींचा (भय कथा)

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1
कल्की अवतार
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2
हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1
हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2
योगसामर्थ्य 1
योगसामर्थ्य 2
तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1
तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2
कसबा गणपती
इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव
रुद्राभिषेक
भविष्यकथानाची सिद्धी 1
भविष्यकथानाची सिद्धी 2
भविष्यकथानाची सिद्धी 3
शोध अश्वत्थामाचा 3
Naustradamus 1
Naustradamus 2
कोकणेश्वर महादेव
लावणी ६४ वी
एका अप्सरेच्या मुली
नेपाळमध्ये मोठा भूकंप
मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले
जगातील सहा न उलगडलेले रहस्य .
चेटकीण प्रथेचा काळा इतिहास
संत नामदेव
शिव
भारतामधील Top 10 मंदिरे
दैवी शक्ती
पृथ्वीच्या पाठीवर
सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण
पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र
वास्तुपुरुष
गुढीपाडवा
देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये
पोस्ट दैवी शक्तीं
मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........
संतांचा सहवास
सध्या दैवी शक्ती
ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।।
।।ॐ।। ओम नम: शिवाय।
भारताने लावलेले शोध
योगीराज संत सोहिरोबानाथ...
महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी
द अंबेर रुम
मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय?
हिंदू धर्म
महाभारत एक प्राचीन ग्रंथ
तीर्थस्थळाचे नाव
महात्मा बसवेश्वर
चैत्र शुद्ध नवमी
गंगासागर
भारतातील ऋषीमुनीं
विमानाचा शोध
भगवान श्रीकृष्ण
महाराष्ट्रात महानुभाव
अघोरी
कुलइतिहास
द्रौपदीला
द्रौपदीचे वस्त्रहरण
दत्ताची नावे
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..
भाग २ रा ....रुपकुंड
श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.
भारतीय संस्कृती
महाराज कोण होते, कोठून आले
दैवी किंवा देवता
‘गावपळण!’
गणपती विषयी
काळभैरव
13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....
वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण
गरुडपुराण
प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...
|| गणपती बाप्पा मोरया ||
अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर
पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...
श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात)
मयंग : आसाम
गावाचे नाव :- वालावल
मल्हारी मार्तंड खंडोबा
डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..
दत्तावतारी
**** भूतांचे प्रकार **** भाग १-
Part - 1 पिशाच्च
रुद्राक्ष भाग २
माफ करा वाचकांनो
आजचे अनुभव
||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||
चक्र
आपण जानता आहात का ?
गुरु सामर्थ्य
मी तन्वी रेडी
नामस्मरण
नामसाधनेची
येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार !
१९२१ सालची गोष्ट
दिनदर्शिकेप्रमाणे
महाभारतातल्या
हिमालयीन यती/ हिममानव:-
अखंड नामस्मर
मनुष्य हा कल्पना विलास
तबकड्या बहुधा पाण्यावर
ध्यानावस्थेत
भगवान पतंजली
महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या
सोमजाई देवीचा इतिहास
लावणी ४४ वी