Android app on Google Play

 

महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी

महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी आणि पांडवांची पत्नी होती. कौरवांनी आयोजित केलेल्या जुगाराच्या खेळात द्रौपदीला पणाला लावण्यात आले होते. पांडव या खेळामध्ये हरले आणि त्यानंतर दुशासनाने भर सभेत द्रौपदीला अपमानित केले. द्रौपदीच्या आयुष्यातील हे पैलू जवळपास सर्वांना माहिती असावेत परंतु फार कमी लोकांना द्रौपदीसंदर्भातील अनेक रहस्यमयी गोष्टी माहिती नसाव्यात. आज आम्ही तुम्हाला या खास गोष्टींची माहिती देत आहोत... द्रौपदी पूर्वजन्मात एक गुणवान मुलगी होती. ती रूपवती, गुणवती आणि सदाचारणी होती परंतु पूर्वजन्मातील कर्मामुळे कोणीही तिला पत्नी स्वरुपात स्वीकार केले नाही. त्यामुळे दुःखी होऊन तिने तपश्चर्या केली. तिच्या कठोर तपावर भगवान शिव प्रसन्न झाले आणि तिला वर मागण्यास सांगितले. महादेवाला पाहून द्रौपदीला खूप आनंद झाली आणि तिने आनंदाच्या भरात वारंवार सर्वगुणयुक्त पतीचे वरदान मागितले. महादेव तिला म्हणाले की, तू मनासारखा पती मिळावा यासाठी माझ्याकडे पाच वेळेस प्रार्थना केली आहे. यामुळे तुला पुढील जन्मात एक नाही तर पाच पती मिळतील. तेव्हा द्रौपदीने एकाच पतीची मागणी केली परंतु महादेवाने दिलेले वरदान व्यर्थ जाऊ शकत नसल्यामुळे तिला पाच पती प्राप्त होण्याचा आशीर्वाद मिळाला. महाभारतातील सभापर्वातील वर्णनानुसार इंद्रप्रस्थमध्ये राजा युधिष्ठीरने राजसूय यज्ञाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये हस्तिनापुरवरून दुर्योधन आपल्या भावंडांसोबत उपस्थित झाला होता. या यज्ञामध्ये विविध देशांचे राजे-महाराजे सहभागी झाले होते. येथे एका महालाचे निरीक्षण करताना दुर्योधनाला उपहासाचे पात्र बनावे लागले होते. दुर्योधन सभा भवनात भ्रमण करताना स्फटिक मणिमय स्थळावर पोहोचला. तेथे पाणी असावे असे दुर्योधनाला वाटल्यामुळे त्याने वस्त्र वर उचलले. त्यानंतर स्फटिकाच्या मण्याप्रमाणे स्वच्छ सुशोभित पाण्याने भरलेल्या कुंडाला स्थळ मानून चालत असताना तो त्यामध्ये पडला. हे दृश्य पाहून भीम, अर्जुन, नकुल, सहदेव त्याच्यावर खूप हसले. दुर्योधनाला या गोष्टीचा खूप राग आला. महाभारताच्या सभापर्वामध्ये या घटनेचा एवढाच उल्लेख आहे. या ग्रंथामध्ये असे कोठेही लिहिलेले नाही की, द्रौपदी दुर्योधनाला या महालात भेटली आणि तिने त्याचा अपमान केला. काम्यक वनात पांडव आल्याचे श्रीकृष्णाला समजताच ते आपली पत्नी सत्यभामासोबत काम्यक वनात पांडवाना भेटण्यासाठी पोहचले. त्यठिकाणी पांडवा आणि श्रीकृष्णामध्ये चांगलीच चर्चा रंगली तर दुसरीकडे द्रौपदी आणि सत्यभामा एकमेकींची विचारपूस करत होत्या. त्यावेळी सत्यभामाने द्रौपदीला विचारले की, तुझे सर्व पती शूरवीर आहेत. तू या सर्वांना कशाप्रकारे प्रसन्न ठेवतेस ज्यामुळे ते कधीही तुझ्यावर क्रोधीत होत नाहीत आणि सदैव तुझ्या वशमध्ये राहतात. पांचाळनरेश द्रुपद यांची अशी इच्छा होती की, द्रौपदीचे लग्न अर्जुनासोबत व्हावे. यामुळे त्यांनी एक खास धनुष्य तयार केले आणि राजमहालाच्या छतावर एक फिरते यंत्र बसवले. त्या यंत्रावरील माशाच्या डोळ्यावर जो अचूक निशाणा साधेल त्याच्याशी द्रौपदीचे लग्न होईल. दुर्पद राजाला विश्वास होता की, फक्त अर्जुनच हे कार्य पूर्ण करू शकतो. जेव्हा कोणत्याही राजकुमाराला द्रौपदी स्वयंवरातील लक्ष्य भेदता आले नाही, तेव्हा ब्राह्मणाच्या रुपात अर्जुन समोर आला आणि त्याने अचूक लक्ष्य भेदले. हे पाहून क्षत्रिय राजे-महाराज क्रोधीत झाले आणि त्यांनी आपला हा अपमान आहे असे समजून द्रुपद राजावर हल्ला केला. तेव्हा द्रुपद राजाच्या संरक्षणासाठी अर्जुन आणि भीम समोर आले. त्यांनी सर्व राजांना पराजित केले. शेवटी श्रीकृष्णाने मध्यस्थी केल्यानंतर युद्ध समाप्त झाले. त्यानंतर अर्जुन द्रौपदीला घेऊन स्वग्रही गेला. पांडवानी द्रोपदीसाठी एक नियम बनवला की, एका नियमित काळापर्यंत प्रत्येक भावाकडे द्रोपदी राहील. जेव्हा एक भाऊ द्रौपदीसोबत एकांतात राहील तेव्हा त्या ठिकाणी दुसरा भाऊ जाणार नाही. कोणीही या नियमाचे उल्लंघन केल्यास त्याला १२ वर्ष ब्रह्मचारी बनून वनामध्ये राहावे लागेल. इंद्रप्रस्थ राज्यामधील एका ब्राह्मणाच्या घरातील गाय चोरीला गेली. त्या ब्राह्मणाने अर्जुनाकडे मदत मागितली. अर्जुनाचे शस्त्र ज्या महालामध्ये ठेवण्यात आले होते. त्याच महालात युधिष्ठीर द्रौपदीसोबत बसलेले होते. नियमानुसार अर्जुन त्या महालामध्ये प्रवेश करून शकत नव्हता. परंतु अर्जुनाने विचार केला की, मी या ब्राह्मणाची मदत केली नाही तर हा अधर्म होईल. या विचाराने अर्जुनाने नियम मोडला आणि युधिष्ठिराच्या महलात जाऊन शास्त्र घेऊन आला आणि ब्राह्मणाची गाय परत मिळवून दिली. नियम मोडल्यामुळे अर्जुन युधिष्ठिराची आज्ञा घेऊन १२ वर्ष वनवासासाठी गेला. वनवासाच्या काळामध्ये एकदा अर्जुन गंगा नदीमध्ये स्नान करत होता. तेवढ्यात नागकन्या उलूपीने कामासक्त होऊन अर्जुनाला पाण्यामध्ये ओढून नेले. उलूपी नागकन्येच्या कामना पूर्तीसाठी अर्जुन रात्रभर तेथेच थांबला. दुसर्या दिवशी अर्जुन हरिद्वार या ठिकाणी आला. उलूपीने अर्जुनाला एक वरदान दिले होते की, कोणत्याही जलचर प्राण्यापासून त्याला कोणताही त्रास होणार नाही. वनवास काळामध्ये अर्जुन मणिपूर या ठिकाणी पोहचला. तेथील राजा चित्रवाहन यांची मुलगी चित्रांगदाला पाहून अर्जुन तिच्यावर मोहित झाला. अर्जुनाने चित्रवाहन राजाला आपला परिचय देत चित्रांगदाला लग्नाची मागणी घातली. तेव्हा चित्रवाहन राजाने सांगितले की, माझी एकच मुलगी असून मी पुत्रिकाधर्मानुसार तिचे लग्न करणार. म्हणजे चित्रांगदाचा मुलगा माझा दत्तक मुलगा मानला जाईल आणि माझा वंश तो पुढे चालवेल. अर्जुनाने चित्रवाहन राजाची अट मान्य केली आणि त्यानंतर त्या दोघांचे लग्न झाले. मुलगा झाल्यानंतर अर्जुनाने राजाची अनुमती घेऊन मणिपूर राज्य सोडले. वनवास काळामध्ये अर्जुन प्रभास क्षेत्री पोहचला. ही बातमी जेव्हा श्रीकृष्णाला समजली तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला भेटण्यासाठी प्रभास क्षेत्रावर गेले. श्रीकृष्ण अर्जुनाला द्वारकेत घेऊन आले. त्या ठिकाणी अर्जुनाने श्रीकृष्णाची बहिण सुभद्रा हिला पाहिले. सुभद्राही अर्जुनाला पाहून त्याच्याकडे आकर्षित झाली. श्रीकृष्णाने दोघांच्या मनातील गोष्ट ओळखली आणि त्यांनीच अर्जुनाला सुभद्राहरण करण्याचा सल्ला दिला. सुभद्रा रैवतक पर्वतावर पूजा करण्यासाठी आल्यानंतर अर्जुनाने तिचे हरण(पळवले) केले. ही गोष्ट यादवांना समजल्यानंतर त्यांनी पांडवांशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. परंतु श्रीकृष्णाने नीतिगत वाचन सांगून सर्वांना शांत केले. त्यानंतर अर्जुनाला परत द्वारकेत बोलावले आणि सन्मानाने त्या दोघांचे लग्न लाऊन दिले. साभार :- दैनिक भास्कर ....

शोध दैवी शक्तींचा (भय कथा)

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1
कल्की अवतार
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2
हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1
हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2
योगसामर्थ्य 1
योगसामर्थ्य 2
तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1
तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2
कसबा गणपती
इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव
रुद्राभिषेक
भविष्यकथानाची सिद्धी 1
भविष्यकथानाची सिद्धी 2
भविष्यकथानाची सिद्धी 3
शोध अश्वत्थामाचा 3
Naustradamus 1
Naustradamus 2
कोकणेश्वर महादेव
लावणी ६४ वी
एका अप्सरेच्या मुली
नेपाळमध्ये मोठा भूकंप
मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले
जगातील सहा न उलगडलेले रहस्य .
चेटकीण प्रथेचा काळा इतिहास
संत नामदेव
शिव
भारतामधील Top 10 मंदिरे
दैवी शक्ती
पृथ्वीच्या पाठीवर
सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण
पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र
वास्तुपुरुष
गुढीपाडवा
देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये
पोस्ट दैवी शक्तीं
मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........
संतांचा सहवास
सध्या दैवी शक्ती
ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।।
।।ॐ।। ओम नम: शिवाय।
भारताने लावलेले शोध
योगीराज संत सोहिरोबानाथ...
महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी
द अंबेर रुम
मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय?
हिंदू धर्म
महाभारत एक प्राचीन ग्रंथ
तीर्थस्थळाचे नाव
महात्मा बसवेश्वर
चैत्र शुद्ध नवमी
गंगासागर
भारतातील ऋषीमुनीं
विमानाचा शोध
भगवान श्रीकृष्ण
महाराष्ट्रात महानुभाव
अघोरी
कुलइतिहास
द्रौपदीला
द्रौपदीचे वस्त्रहरण
दत्ताची नावे
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..
भाग २ रा ....रुपकुंड
श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.
भारतीय संस्कृती
महाराज कोण होते, कोठून आले
दैवी किंवा देवता
‘गावपळण!’
गणपती विषयी
काळभैरव
13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....
वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण
गरुडपुराण
प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...
|| गणपती बाप्पा मोरया ||
अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर
पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...
श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात)
मयंग : आसाम
गावाचे नाव :- वालावल
मल्हारी मार्तंड खंडोबा
डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..
दत्तावतारी
**** भूतांचे प्रकार **** भाग १-
Part - 1 पिशाच्च
रुद्राक्ष भाग २
माफ करा वाचकांनो
आजचे अनुभव
||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||
चक्र
आपण जानता आहात का ?
गुरु सामर्थ्य
मी तन्वी रेडी
नामस्मरण
नामसाधनेची
येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार !
१९२१ सालची गोष्ट
दिनदर्शिकेप्रमाणे
महाभारतातल्या
हिमालयीन यती/ हिममानव:-
अखंड नामस्मर
मनुष्य हा कल्पना विलास
तबकड्या बहुधा पाण्यावर
ध्यानावस्थेत
भगवान पतंजली
महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या
सोमजाई देवीचा इतिहास
लावणी ४४ वी