Naustradamus 2
naustrademus ने लिहील आहे की , " माझ्या कानांवर पडणाऱ्या भाकितांचा प्रभाव एवढा आहे, की सर्व भाकिते उघड करण्याचे धाडसच होत नाही . "
naustrademus ने आपल्या सीझर या पुत्राला उद्देशून एक अर्पण पत्रिका लिहिली . त्यात हा दाष्ट्र म्हणतो की " मी भाकीत वर्तवत आलो , पुढे तसेच घडल्याचे अनुभवला आले . नजीकच्या आणि दीर्घकाळच्या भकितन्बद्दल मौन पाळाव अस मला वाटत . आज अस्तित्वात असलेली राष्ट्रे , धर्म आणि पंथ यांच्या बाबतीत मी विपरीत भाकीत क्ले तर ते आजच नष्ट केले जाइल . माझ्या भाकितांचे पुस्तकच ते पुढच्या पिढीसाठी ठेवणार नाहीत आणि म्हणूनच मी ही सर्व भाकिते गूढ व सांकेतिक भाषेक लिहिली आहेत ."
" मला भविष्यात घडून येणाऱ्या घटना , घटनेला जबाबदार व्यक्तींची नावे , तारीख आणि तपशील सांगता येईल ; पण मला असे करता येणार नाही . "
१९९९ ते २०२५ हा भाग naustrademus च्या दृष्टीने कमालीचा उलथापालथीचा आहे. म्हणुनच आपल्या भकितान पैकी जवळजवळ ६० टक्के त्याने याच कालखंडा साठी खर्च केले ***
१९०० ते १९९९ हा सर्वात जास्त रक्तलांच्छित कालखंड होता . त्यात २ महायुद्धे झाली . याचा naustrademus च्या भाकीतांत सूचक उल्लेख आहे . भारता संबधी ही अनेक घटना त्याने आधीच वर्तवल्या होत्या . त्यात शिवाजी महाराज , १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध , म. गांधी , देशाची फाळणी , इंदिरा व राजीव गांधी यांची हत्या या घटनांचा उल्लेखही त्याने सांकेतिक भाषेत केला आहे .
जागतिक पटावरची प्यादीही अशी हलत आहेत , कि संघर्ष आता अटळ आहे , हे सुचित होत आहे .
हे तसरे महायुध्द किती भयानक असेल याचे naustrademus ने केलेले वर्णन थरकाप उडवणारे आहे . त्यावर त्याने तब्बल २७० श्लोक लिहिले आहेत .
रशिया आणि अमेरिका विरुद्ध चीन व अरब राष्ट्रे यांच्यात कमालीचे विनाशक आणि विश्व हादरवून टाकणारे युद्ध छेडले जाईल .यातील महत्वाचे संघर्ष युरोपच्या भूमीवर होतील . या युद्धात अण्वस्त्रे , जंतू अस्त्रे , रासायनिक अस्त्रे यांचा बेहिशोबी वापर होईल . जगातील प्रत्येक देशावर याचा काहीना काही परिणाम होणारच . भारतालाही त्याची झाल सोसावी लागणार आहे . या तिसर्या महायुद्धाचे वर्णन naustrademus ने अत्यंत विलक्षण रीतीने केले आहे आणि ते त्याच्या दहाही ' सेञ्च्युरिज मध्ये पसरलेले आहे. ते एकत्र केले तर पंधराव्या शतकात मागमूसही नसलेल्या ; पण आज अस्तित्वात आलेल्या अनेक गोष्टींचा त्यात उल्लेख आहे , हे लक्षात येईल ,
पहिल्या शतकाच्या २९ व्या श्लोकात तो म्हणतो की " एक मासा असा उत्पन्न होईल , की जो पाण्यावरून व जमिनीवरून सारख्याच वेगाने पळेल . त्याची उत्पत्ती विदेशी भूमीवर झाली असेल . हा मासा भयानक आग ओकेल . हा सर उल्लेख पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रे याचा आहे . ' पौलेरीज ' आणि ' सबरोक ' ही क्षेपणास्त्रे अमेरिकेत विकसित केली गेली असून ती खोल समुद्रात , भूमीवर व अवकाशात वापरता येतात . "
नागासाकी व हिरोशिमावरील अग्निवर्षाव , पिनाटुबो ज्वालामुखी जागृत होणे , माणसाने चंद्रावर जाणे या सार्या घटना naustredemus च्या भाकीतांप्रमाणे तंतोतंत खर्या ठरल्या . ***
naustredemus ने नवव्या सेञ्चुरिज च्या ५१ व्या श्लोकात म्हंटले आहे , " लाल शक्ती विरुद्ध सगळे एकत्र येतील. जल - स्थळ व अवकाशाद्वारे युद्ध होईल . शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न कमी पडतील . या महविनशात एकच अपवाद वगळता सारेच विनाशग्रस्त होतील . "
याचा अर्थ तिसरे महायुद्ध चीन सुरु करणार असे naustradmus ने स्पष्ट म्हंटले आहे ,
आता लाल शक्ती म्हणावा असा एकच देश उरला आहे . चीन मध्ये लाल रंग , लाल पुस्तक आणि लाल ध्वज याचे प्रचंड प्रस्थ आहे .
या लाल शक्ती विरुद्ध तारे एकत्र येतील असा उल्लेख आहे . चीन हा कायम खिश्चन धर्माचा कायम विरोधक राहिला आहे . १९९९ - २००० च्या सुमारास पोप आशिया खंडात येउन गेले ; पण चीनने त्यांना आपल्या भूमीवर पाय ठेऊन दिला नाही हे लक्षात घेतले पाहिजे .
naustrademus च्या भाकितांमध्ये वारंवार ३ ख्रिस्त विरोधकांचा वारंवार उल्लेख येतो . त्यात पहिला नेपोलियन , दुसरा हिटलर आणि तिसरा चेगीझखान आठवण करून देणारा , तिसरे महायुद्ध सुरु करणारा हा चिनी नेता .
naustrademus च्या सेञ्चुरिज चे अनेक भाष्यकार आहेत . पण त्या सर्वांमध्ये तिसरे महायुद्ध , महान भारतीय नेता आणि इतर बाबतीत बहुतेकांचे बहुमत आहे .
पण तो काल इ.स. १९९९ ते २०२५ हा असेल यावर त्यांची एकवाक्यता दिसून येत नाही . पण बहुतेकांच्या मते २१ व्या शतकाच्या पूर्वार्धात या घटना घडतील हे ठाम आहे .
naustrademus ने नेपोलियन चा उल्लेख सांकेतिक भाषेत केला होता . हिटलरचा 'हिल्लर' म्हणून . तसेच विविध क्षेपणास्त्रे , पाणबुड्या यांचा अतिशय संदिग्ध भाषेत केलेला आढळतो .
एरिका चिथेम या naustrademus वरच्या नमन्तिक भाष्यकार आहेत .त्यांनी भाकितांवर त्या बोलतात की " या युद्धाची सुरवात new york वरच्या हल्याने होईल . newyork वर बोंब व रसायनांचा मारा होईल . "
सहाव्या शतकातील ९७ व्या श्लोकात naustrademus म्हणतो की " ४५ अंशावर आकाश जळेल . बड्या नव्या शहरांवर अग्निप्रलय चालून येईल . "
अमेरिकेतील newyork शहर हे ४० ते ४५ अंशावर आहे . याच ठिकाणी शिकागो , माद्रिद , रोम ,बुखारेस्त ही प्रसिध्द शहरे आहेत .
सेञ्चुरिज च्या सातव्या शतकातील दुसर्या श्लोकात या लेसर किरणांच्या युद्धातील वापराचा उल्लेख केला आहे .
तो म्हणतो , " युद्धात लेसर किरणांचा उपयोग करण्यात येईल . या किरणांना कुणीच प्रतिबंध करू शकणार नाही . सैनिक भयचकित होतील . शत्रू पासून स्वतः ला आणि आपले हल्लेच लपवू शकणार नाही . त्यांना ठार मारले जाईल ."
naustrademus ने या श्लोकात लेसर ऐवजी ' एरलेस ' हा शब्द वापरला आहे . अशा इंग्रजी शब्दांना अनाग्राम म्हणतात . anagram म्हणजे शब्दांतील अक्षरांचा क्रम बडून तयार केलेला नवा शब्द .
naustrademus च्या लिखाणात असे अनेक शब्द ठिकठिकाणी वापरलेले आढळतात .
तिसर्या महायुद्धाच्या संदर्भात naustrademus ने वर्तवलेले आणखी एक हादरवून टाकणारे भाकित त्याच्या सेञ्चुरिज्च्य तिसर्या शतकाच्या ५६ व्या श्लोकात आहे . या श्लोकांत naustrademus म्हणतो की , " वीस वेळा तीन प्रतिशत , अनिष्ट प्लेग , वज्रपात आणि युद्ध , मोन्तबेन , पेरिस , लियन , मोंटे पोलेरीया ला भीती ."
या श्लोकाचा अर्थ बहुतेक भाष्यकारांनी सारखाच लावला आहे तो असा : वीस वेळा ३ प्रतिशत म्हणजे या युद्धात जगाची साथ टक्के लोकसंख्या नष्ट होईल . या युद्धाच्या शेवटी रोगराई , प्रचंड हानी यांचेच अवशेष पाहायला मिळतील . फ्रान्सच्या प्रचंड हानीचे यात संकेत आहेत .
याच संदर्भात सातव्या शतकातील पाचवा शोक अधिक झगझगीत प्रकाश टाकणारा आहे .
त्याचा अर्थ स्पस्थ असला तरी तो तितक्या स्पष्ट पणे सध्याच्या असहिष्णू आणि धर्मांध वातावरणात सांगणे योग्य होणार नाही . पहिल्या २ खिस्त विरोधकांनी जेवढी हानी केली त्या समोर हा तिसरा ख्रिस्त विरोधक जेवढी हानी करेल त्या समोर ती नगण्य वाटेल .त्याला अरब राष्ट्रांची साथ मिळणार आहे असे त्याने स्पष्टपणे म्हंटले आहे .
त्याचे संपूर्ण जगावर्चे अमेरिका आणि पश्चिम यांचे वर्चस्व संपवणे हेच ध्येय असेल . आफ्रिकन देशही त्याला साथ देतील . कारण त्यांना गोर्यांच्या आपल्यावरील अत्याचाराचा सूड घ्यायचा असेल .
naustredemus ने तिसर्या महायुद्धाला ' आर्म गेडन ' हा शब्द वापरला आहे . या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ सात आणि असत यातील निर्णायक आणि अखेरचे अति व्याप्त महायुद्ध असे करतो . बायबल मध्ये देखील या शब्दाचा उल्लेख आहे .
naustrademus ने आपल्या सेन्तुरिज मधील दोनशे समर श्लोक या आर्म गेडन बद्दल भाकित व्यक्त करण्यासाठी लिहिले आहेत . तिसर्या महायुद्धापूर्वी रशियात क्रांती होईल , असे naustrademus ने म्हटले आहे .
डोलारेस केननया सायकिक इंवेस्टीगेटर ने पाचशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या naustrademus शी अतींद्रिय शाक्तिञ्च वापर करून संपर्क साधला . आणि त्याच्या कडून त्याच्या गूढ भाकितांचा अर्थ समजून घेतला .
मेक्स फोन्तब्रुन आणि त्याचा मुलगा जीन चार्लस यांनीही naustredemus च्या भाकितावर अफाट परिश्रम , संशोधन आणि अभ्यास करून ग्रंथ लिहिले आहेत .
मेक्स naustredemus च्या भाकीतांबाबत सांगतो कि " भविष्यकाळात उत्तर आफ्रिकेत बंद करून उठणार आहेत . पाश्चिमात्य खिश्चन संस्कृतीच्या विरुद्ध जे एक महा प्रचंड आणि अमानुष असे आंदोलन छेडले जाणार आहे त्याची ही नांदी आहे ."
naustredemus चे तिसर्या महायुद्धाचे वर्णन अंगावर कट आणणारे आहे . चीन व अरब राष्ट्रे यांच्यामुळे ते सूरु होणार आहे . हे युद्ध काही टप्प्यानमध्ये लढले जाईल . यात अण्वशस्त्रांचा मर्यादित वापर झाला तरी प्रचंड हानी होणार आहे .
गुरु आणि शनि जेव्हा मेष राशीत प्रवेश करतील तेव्हा हे युद्ध सुरु होणार आहे असे naustredemus ने संकेत दिला आहे . प्रारंभीच्या मतभेदानंतर रशिया व अमेरिका एकत्र येतील . आणि चीन अरब देशांना आपल्या नेतृत्व खाली एकत्र आणण्यात यशस्वी होईल . या नव्या युती मुळे जगातील प्रचलित सत्तेचा समतोल ढळू लागेल . संयुक्त राष्ट्रसंघासारखी संघटना यापुढे निष्प्रभ ठरेल . मध्यपूर्वेत एक हुकुमशहा निर्माण होईल आणि तो पुन्हा इराण वर आक्रमण करेल .
त्याच सुमारास हिंदी महासागरात प्रचंड उल्का कोसल्यने अनेक देशांची हानी होईल . मध्य पुर्वेतला हा नवा हुकुमशहा खिश्चन विरुद्ध मोहीम उघडेल .
मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिका येथे युद्धाचा आगडोंब उसळेल . पाश्चात्यांच्या प्रवाभाखाली असलेली म्मोरोक्कोचॆ राजवट उलथली जाईल . इस्त्रायल वर ही हल्ला होईल . विजयी अरब फौजा दक्षिण आणि मध्य आफ्रिकेतील देशांना जबरदस्तिने आपल्या आघाडित सामील करून घेतील .
याच सुमाराला मध्य आशियाला भूकंपाचा प्रचंड धक्का बसेल . त्यामुळे काही देशांची मोठी हानी होईल ; परंतु याच वेळी रशिया आणि अमेरिका लष्करी युती जाहीर करतील . त्यामुळे आक्रमक चीनी नेत्याच्या मनात धास्ती निर्माण होईल .
या युद्धात चीनी व अरब फौजा रशिया आणि अमेरिकेवर क्षेपणास्त्रे फेकतील . तसेच जंतू अस्त्रांचा आणि रासायनिक अस्त्रांचाही वापर होईल . त्यामुळे कानडा , दक्षिण युरोप , रशिया , अमेरिका वगैरे भागात महाभयंकर रोगराई पसरेल . प्रुत्व्हिपसुन लांब २७० मैलावर फिरणाऱ्या स्थानका वरून हा हल्ला करण्यात येईल असेही naustredemus म्हणतो .
अण्वस्त्रांच्या हल्यामुळे हल्लकल्लोळ माजला असताना पूर्वेच्या फौजा फ्रान्स च्या दिशेने आपली कूच करतील . या फ़ौजनकदे वेगळ्या प्रकारची शस्त्रे असतील . त्यांनी मोठी हानी होईल . चीनी व अरब फौजा तुर्कस्थान विरुद्ध मोहीम सुरु करतील . जंतू युद्धामुळे ग्रीसची हानी होईल . अथेन्स , अल्बेनिया , युगोस्लाविया , इटली यांनीही या पाशवी हल्ल्यातून वाचता येणार नाही .
त्याच वेळी इटलीची फाळणी होईल . उत्तर इटली स्वतंत्र राष्ट्र घोषित होईल . आक्रमक चर्च व पोप यांना देशाबाहेर हल्कुन दिले जाईल . अशावेळी चर्च अमेरिकेकडून लष्करी सहाय्य मागेल .
शत्रूच्या फौजा रोम उध्वस्त करतील .आकाशातून बोंब चा वर्षाव होईल .त्यावेळी फ्रान्स नौदल शत्रूची बरीच हानी करेल .या हल्ल्यात तोंड देण्यासाठी पाण्यावरून चालणार्या नव्या रणगाड्यांचा वापर शत्रू करेल .फ्रान्स व इटली शत्रूच्या फौजांना एकत्र येण्यासाठी तोंड देतील ,
तिसर्या महायुद्धाच्या काळी इंग्लंडचा दक्षिण भूभाग पाण्याखाली जाईल असे भाकीत केले आहे .
अशावेळी तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला देशातील म्हणजे भारतातील नेता वादळ निर्माण करील . सत्ता , कीर्ती , उत्तम प्रशासन यामुळे या देशाची प्रगती होईल . हा थोर नेता स्वतः साठी आणि देशासाठी गुरवार हा सुट्टीचा वार जाहीर करील .
naustrademus ने भारताचा उल्लेख करण्यासाठी अनेक शब्द वापरले आहेत . कधी तो सागरावरून ओळखला जाणारा धर्म म्हणतो . कधी तिन्ही बाजूंनी पाणी असलेला देश असाही उल्लेख करतो . ओरिएन्त , नेपच्यून , गोड चेरियन आणि eastern warrior एवढे हे उल्लेख आढळतात .
भारतीय विश्व नेत्याच्या उदयाची ग्वाही naustrademus ने फिरवली आहे . हा नेता सर्व दुष्ट शक्तींचा नाश घडवून जगावर अधिराज्य गाजवेल . त्याच्या काळात जगात शांतता नांदेल , असेही naustrademus चे म्हणणे आहे .या भारतीय महापुरुषाचे वर्णन करायला या फ्रेंच द्रष्ट्याने ६० श्लोक खर्ची घातले आहेत . यावरून त्याला त्याचे किती महत्व वाटले असावे हे लक्षात येते .
भारताचा तिसर्या महायुद्धातील सहभाग व naustrademus तसेच वेद पुराणांनी गौरवलेला तो ' अवतारी ' विश्वनेता याबद्दल माहिती पुढच्या सत्रात ....
क्रमश: