Android app on Google Play

 

नामसाधनेची

नामसाधनेची हि पथ्ये एखाद्याने काळजीपूर्वक पळून आपली नामसाधना नेटाने सुरु ठेवली तर नामसाधनेचे अनेक दिव्य अनुभव त्यास प्राप्त झाल्याशिवाय खचित राहणार नाहीत. तथापि, नामधारकानी आणखी एक महत्त्वाची गोष्ट नित लक्षात ठेवली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे 'नामस्मरण' आणि 'नामोच्चारण' या दोहोतील फरक ! पुष्कळसे साधक रोज खूप जप करतात; परंतु त्यापैकी बहुतेकजण केवळ 'नामोच्चारण' करताना दिसतात. त्यांच्याकडून नामस्मरण होताच नाही ! तेव्हा प्रथम नामस्मरण आणि नामोच्चारण यात काय फरत आहे ते पाहू या. नामोच्चारण याचा अर्थ तोंडाने नामाचा केवळ उच्चार करणे असा होतो. तोंडाने राम, कृष्ण, दत्त, शिव यांचे केवळ नाम उच्चारणे म्हणजे नामोच्चारण होय. यात 'ॐ नम: शिवाय' , किंवा ' श्रीराम जय राम जय जय राम ' इ. मन्त्रजपांचाही समावेश होतो; परंतु या मंत्राजापाचा केवळ उच्चार करणे आणि नामस्मरण करणे यात खूप फरक आहे. कारण "नामस्मरण" याचा अर्थ तोंडाने नाम घेत असताना त्याच वेळी बिश्तमंत्राच्या दैवताचे स्मरणही मनात झाले पाहिजे. नामस्मरणात या शब्दातील ' स्मरण ' हा शब्द महत्त्वाचा आहे. नामोच्चारणात हे स्मरण नसते. कबीरांनी याचे वर्णन करताना म्हटले आहे; कि "माला हातात फिरते आहे, आणि जीभ मुखात फिरते आहे ; परंतु मन मात्र दशदिशांत फिरते आहे !" अश्या जपला एक प्रकारचा यांत्रिकपणा येतो. अश्या वेळी मुखाने नामाचा उच्चार होत असला तरी मन रिकामे असल्याने ते नेहमीप्रमाणेच कुठेही भरकटत असते आणि त्यावेळी अनेक सांसारिक चिंता, विषय, इत्यादीची गर्दी मनात होते. हे मनाचे भरकटणे तसे चोवीस तासच सुरु असते. याचे कारण आपली वृत्ती मुळातच बहिर्मुख असते. बाहेरच्या जगात काय चालले आहे हे पाहण्यासाठी आपले मन ज्यात त्यात आपले नाक खुपसत असते; परंतु उपासनेचा मुल हेतू हा बहिर्मुख मनाला अंतर्मुख करणे - आत्म्याकडे केंद्रीभूत करणे- हा आहे. त्याचा प्रवाह बदलाने व तो भगवंताकडे वळविणे हि महत्त्वाची गोष्ट आपल्याला साधावयाची आहे आणि केवळ नामोच्चारणाचा फारसा उपयोग होत नाही. म्हणूनच संत नामदेवांनी या नामोच्चारणाला " वाचेचा गोंधळ " असे म्हटले आहे. ते म्हणतात, " नाम घेता हे वैखरी | चित्त धावे विषयावरी | नाम रुप नाही मेळ | अवघा वाचेचा गोंधळ || " यासाठीच हा वाचेचा गोंधळ न करता स्मरण्युक्त नाम घेण्याबद्दल त्यांचा आग्रह आहे. ते पुढे म्हणतात- " नवल स्मरणाची ठेव | स्मरणामाजी प्रगटे देव | एक जनार्दनी नाम | नामी प्रगटे आत्माराम || " तथापि, अगदी सुरुवातीच्या कळत नाम आणि रूप यांचा मेल साधकाला कदाचित साधता येणार नाही. बहिर्मुख मनाला एकदम उलट दिशेने वळवून अंतर्मुख करणे ती तारेवरची कसरत सर्वांनाच जमेल असे नाही, तथापि, हे न जमेल तरी साधकांनी निराश होण्याचे कारण नाही. कारण या संदर्भात श्री ब्रम्हचैतन्यमहाराज सांगतात कि, " नाम घेणे हे महत्त्वाचे आहे. ते घेत असताना रूपाचे ध्यान राहिले तर उत्तमच ; पण ते तसे न राहिले तरी नाम घेताना रूपाचे स्मरण सुक्ष्ण रूपाने होत असतेच असते. उदाहरणार्थ एका गृहस्थाचे घरी ' राम ' नावाचा एक गाडी आहे आणि तो गृहस्थ " राम राम " असा जप करीत बसला आहे ; परंतु परंतु त्याचवेळी त्याचे लक्ष रामाच्या रुपाकडे नसून दुसरीकडेच आहे. त्याच्या मनात त्यावेळी अनेक संसारिक विषय घोळत आहेत. अशा वेळी जर त्याला एकदम विचारले, कि " तुम्ही कोणाचे नाव घेत आहात ? " तर अर्थात, " रामाचे " असेच उत्तर तो देईल : परंतु हे उत्तर देताना त्याच्या मनात ' दाशरथी राम ' हीच व्यक्ती असणार, ' राम गडी ' हि व्यक्ती अर्थातच नसणार ! याचाच अर्थ असा, कि नाम घेताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते. म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये !" श्रीमन्ममहाराजांनी प्राथमिक अवस्तेतील नामधारकांना अशा प्रकारे मोठाच दिलासा दिलेला आहे. श्रीतुकाराम महाराजांनी नामधारकांच्या या अडचणीची कल्पना असावी असे वाटते आणि म्हणूनच ते म्हणतात कि, " नसे तरी मणी वसे | परी वाचे तरी वसो || " कारण अगोदरच नामाचे माहात्म्य पाटणे अवघड आणि ते पटले तरी आलास झटकून मुखातून रोज नाम येणे त्याहून अवघड ! अशा परिस्थितीत ते नाम जिभेवर आले आहे हे देखील काही कमी भाग्याचे नव्हे !

शोध दैवी शक्तींचा (भय कथा)

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1
कल्की अवतार
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2
हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1
हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2
योगसामर्थ्य 1
योगसामर्थ्य 2
तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1
तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2
कसबा गणपती
इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव
रुद्राभिषेक
भविष्यकथानाची सिद्धी 1
भविष्यकथानाची सिद्धी 2
भविष्यकथानाची सिद्धी 3
शोध अश्वत्थामाचा 3
Naustradamus 1
Naustradamus 2
कोकणेश्वर महादेव
लावणी ६४ वी
एका अप्सरेच्या मुली
नेपाळमध्ये मोठा भूकंप
मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले
जगातील सहा न उलगडलेले रहस्य .
चेटकीण प्रथेचा काळा इतिहास
संत नामदेव
शिव
भारतामधील Top 10 मंदिरे
दैवी शक्ती
पृथ्वीच्या पाठीवर
सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण
पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र
वास्तुपुरुष
गुढीपाडवा
देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये
पोस्ट दैवी शक्तीं
मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........
संतांचा सहवास
सध्या दैवी शक्ती
ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।।
।।ॐ।। ओम नम: शिवाय।
भारताने लावलेले शोध
योगीराज संत सोहिरोबानाथ...
महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी
द अंबेर रुम
मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय?
हिंदू धर्म
महाभारत एक प्राचीन ग्रंथ
तीर्थस्थळाचे नाव
महात्मा बसवेश्वर
चैत्र शुद्ध नवमी
गंगासागर
भारतातील ऋषीमुनीं
विमानाचा शोध
भगवान श्रीकृष्ण
महाराष्ट्रात महानुभाव
अघोरी
कुलइतिहास
द्रौपदीला
द्रौपदीचे वस्त्रहरण
दत्ताची नावे
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..
भाग २ रा ....रुपकुंड
श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.
भारतीय संस्कृती
महाराज कोण होते, कोठून आले
दैवी किंवा देवता
‘गावपळण!’
गणपती विषयी
काळभैरव
13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....
वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण
गरुडपुराण
प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...
|| गणपती बाप्पा मोरया ||
अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर
पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...
श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात)
मयंग : आसाम
गावाचे नाव :- वालावल
मल्हारी मार्तंड खंडोबा
डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..
दत्तावतारी
**** भूतांचे प्रकार **** भाग १-
Part - 1 पिशाच्च
रुद्राक्ष भाग २
माफ करा वाचकांनो
आजचे अनुभव
||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||
चक्र
आपण जानता आहात का ?
गुरु सामर्थ्य
मी तन्वी रेडी
नामस्मरण
नामसाधनेची
येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार !
१९२१ सालची गोष्ट
दिनदर्शिकेप्रमाणे
महाभारतातल्या
हिमालयीन यती/ हिममानव:-
अखंड नामस्मर
मनुष्य हा कल्पना विलास
तबकड्या बहुधा पाण्यावर
ध्यानावस्थेत
भगवान पतंजली
महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या
सोमजाई देवीचा इतिहास
लावणी ४४ वी